Shrirampur Protest : 'हिंदूंना हायब्रिड हिंदुत्ववाद्यांपासूनच धोका'; प्रकाश चित्तेंनी गुन्हेगारीची हादरवणारी 'ऑडिओ क्लिप' भरसभेत ऐकवली

Shrirampur Protest Intensifies After Akash Dubayya Murder; Demand for MCOCA Action : आकाश दुबय्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात विविध पक्षांचे नेते सहभागी; प्रकाश चित्ते यांनी कथित 'ऑडिओ क्लिप' सादर करत गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
Prakash Chitte
Prakash ChitteSarkarnama
Published on
Updated on

Shrirampur Crime : हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीविरोधातील आंदोलनाची तीव्रता कायम आहे. बुधवारी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या वेळी हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांनी कथित 'ऑडिओ क्लिप' सभेत सादर करत शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांबाबत गंभीर आरोप केले. तसेच संबंधित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला.

आकाश दुबय्या यांची शनिवारी भरदिवसा निर्घृण हत्या झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या निषेधार्थ सलग चार दिवस श्रीरामपूर (Shrirampur) बंद पाळण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी मोठा निषेध मोर्चा काढत गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना प्रकाश चित्ते यांनी श्रीरामपूरमधील गुन्हेगारीचे (Crime) स्वरूप गंभीर झाल्याचा आरोप केला. त्यांनी सभेत एक कथित ऑडिओ क्लिप सादर केली. तसेच काही घटनांचा उल्लेख करत शहरातील महिलांवरील अत्याचार, खंडणी आणि इतर गुन्हेगारी प्रकारांबाबतही आरोप केले. या सर्व आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Prakash Chitte
Shrirampur Crime Protest :'टोपीपेक्षा भगव्या उपरण्याचीच भीती'; श्रीरामपूर हत्याकांडानंतर भाजपच्या महिला नेत्याचे खळबळजनक विधान

चित्ते म्हणाले की, शहरात खंडणीसह विविध अवैध धंदे सुरू असून संबंधित टोळीवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. "संपूर्ण टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.

Prakash Chitte
Shrirampur Crime : "मला हत्यार द्या, मीच एन्काउंटर करतो..."; आकाश दुबय्याच्या वडिलांचा आक्रोश, बेग गँगवर गंभीर आरोप

अवैध धंद्यांशी याच टोळीचा संबंध

यावेळी त्यांनी एका विशिष्ट टोळीचा उल्लेख करत, त्या टोळीतील काही आरोपी परस्पर नातेवाईक असल्याचा दावा केला. तसेच मटका, जुगार, वाळू उत्खनन, नशेचे इंजेक्शन यांसारख्या कथित अवैध धंद्यांशी या टोळीचा संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपांवर संबंधितांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

पोलिस-गुन्हेगार संबंधांवर घणाघात

याशिवाय, शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचा तसेच काही पोलिस कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याचा आरोपही चित्ते यांनी केला. पोलिसांनी स्वतःहून (सुमोटो) कारवाई करून संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करावे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, आकाश दुबय्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com