Raj Thackrey Politics: ठाकरेंचा ‘ठाकरी’ दणका, सुस्तावलेल्या आयोगानं घेतली मोर्चाची धास्ती; मतदारयादीच्या ‘शुद्धीकरणा’चे आदेश!

Voter list issue of ECI, Opposition aggressive regarding voter list, Raj and Uddhav Thackeray's march tomorrow-निवडणूक आयोगाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दुबार मतदारांची नावे चिन्हांकित करण्याचे आदेश
Harshwardhan-Sapkal-Raj-Thackerey-Raj-Thackerey
Harshwardhan-Sapkal-Raj-Thackerey-Raj-ThackereySarkarnama
Published on
Updated on

Thackeray Morcha News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'वोट चोरी'हा मुद्दा देशभर लाऊन धरला आहे. महाराष्ट्रात याच राज आणि उद्धव ठाकरे बंधू याच विषयावर आक्रमक आहेत. मतदारयादीतील दुबार नावे आणि त्रुटींवर त्यांचा मुख्य आक्षेप आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्या (या.१) मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे.

यासंदर्भात निवडणूक आयोगाने सुरुवातीला मतदारयादी दुरुस्त्या आणि दुबार नावे दुरुस्तीचा अधिकार आपल्याला नाही, अशी भूमिका घेतली होती. यासंदर्भात निवडणूक आयोगाने स्वतंत्र पत्रकही प्रसिद्धी दिले होते. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे या प्रश्नावर अधिक आक्रमक झाले.

Harshwardhan-Sapkal-Raj-Thackerey-Raj-Thackerey
Malegaon Fake Currency Case : पोलिसांनी सहज हटकले अन् नकली नोटांचे घबाड हाती लागलं...

मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. नाशिक शहरासह राज्यातील अनेक ठिकाणी मतदार यादीतील घोळ सप्रमाण सिद्ध करण्यात आला. त्याबाबत सादरीकरण देखील करण्यात आले.

Harshwardhan-Sapkal-Raj-Thackerey-Raj-Thackerey
Shivendraraje Bhonsle: कंत्राटदाराने पत्रकारांच्या उपस्थितीतच क्लब टेंडरींगची टक्केवारीच सांगितली... बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले झाले अस्वस्थ

राज्य निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे कालपर्यंत नकारघंटा वाजविणाऱ्या आयोगाने नरमाईची भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत सूचित केले आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादीतील दुबार नावे चिन्हांकित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर शासकीय निवडणूक प्रतिनिधी प्रत्यक्ष व्यक्तीला भेटून त्याला पर्याय देणार आहेत. त्यानंतर संबंधितांना फक्त एकाच ठिकाणी मतदानाची सुविधा असेल.

दुबार नावे असलेल्या मतदाराने आयोगाच्या प्रतिनिधींना प्रतिसाद न दिल्यास त्यावर पुढील निर्णय होणार आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी संबंधितांकडून अन्यत्र कुठेही मतदान केले नसल्याचे हमीपत्र घेतले जाणार आहे. त्यामुळे मतदार यादीतील दुरुस्तीला चालना मिळाली आहे.

निवडणूकआयोगाचे कामकाज आणि सदोष मतदार यादी या विरोधात उद्या फॅशन स्ट्रीट, चर्चगेट येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यात सहभागी होतील. सध्या विविध आंदोलनाने अडचणीत असलेले सरकार देखील या मोर्चामुळे दबावात आहे.

राज्य निवडणूक आयोग ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधीच अलर्ट झाला आहे. या संदर्भात दुबार आणावे आणि अन्य त्रुटी यावर आयोगाने आपल्या भूमिकेबाबत यू टर्न घेतला आहे. ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा हा इफेक्ट म्हणता येईल.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com