Tribal Corporation Politics: प्रस्थापितांच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नव्या चेहऱ्यांना संधी, मंत्री झिरवाळ, अन् माजी आमदार गावितांच्या चिरंजीवांचीही एन्ट्री

Voters prefer new faces in Maharashtra State Tribal Development Corporation elections, Mixed results-महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीत तरुणांना मिळाली संधी, वैभव पिचड बिनविरोध.
Indrajeet Gavit, Sunil Bhusara & Gokul Zirwal
Indrajeet Gavit, Sunil Bhusara & Gokul ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Tribal Politics News: महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची निवडणूक नुकतीच झाली. त्याची मतमोजणी आज नाशिक येथे करण्यात आली. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

आदिवासी विकास महामंडळ संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दोन दिवसांपूर्वी झाली होती. त्यात राज्यभरातील ११ गटांमध्ये विविध संचालकांची निवड करण्यात आली. आज नाशिक येथे निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी निकम यांनी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला.

विशेष म्हणजे नाशिक विभाग मतदारसंघातून माजी आमदार जे पी गावित यांचे चिरंजीव इंद्रजित गावित यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ हे सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले. त्यांनी माजी संचालक आणि माजी आमदार शिवराम झोले, यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

Indrajeet Gavit, Sunil Bhusara & Gokul Zirwal
BJP Politics: सावरकरांच्या जन्मभूमीत भाजपला सत्ता तर दूर, निवडणुकीत कोंडी होण्याची शक्यताच अधिक, काय आहे कारण?

आज झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या समर्थकांची संख्या लक्षणीय आहे. विशेष म्हणजे प्रस्थापितांच्या या निवडणुकीत यंदा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यातील तरुणांना संचालक मंडळावर संधी मिळाल्याने आदिवासी विकास महामंडळाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होणार आहे.

Indrajeet Gavit, Sunil Bhusara & Gokul Zirwal
Gokul Zirwal Politics: आदिवासी विकास महामंडळाचा पहिला निकाल जाहीर; गोकुळ झिरवाळ, इंद्रनील गावित विजयी!

अहिल्यानगर, पुणे आणि रायगड या मतदारसंघातून वैभव मधुकर पिचड बिनविरोध आले. काळे केवळ राम तुळशीराम हे देखील बिनविरोध विजयी झाले आहेत. या गटातील उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात माघार घेतल्यामुळे दोन्ही संचालकांचा मार्ग मोकळा झाला.

महामंडळावर निवडून आलेले मतदारसंघ संचालक असे, कंसात मिळालेली मते,

धुळे, नंदुरबार, जळगाव मतदार संघ: देवमन तेजमल पवार (६९), वळवी तानाजी भरत (५६).

नागपूर, भंडारा, वर्धा आणि गोंदिया मतदारसंघ: ताराम रमेश नारायण (३५), दुधनाग भरतसिंग चुकेलसिंग (३६). चंद्रपूर: धाडसे मंगेश लक्ष्मण (२३).

यवतमाळ आणि नांदेड: मंगाम अशोक भाऊराव (४२). पालघर आणि ठाणे: सुनील चंद्रकांत भुसारा (९४), पटेकर दिलीप नारायण (९०). गडचिरोली : गोपाळ नकटू उईके (५५), गोटा सैनू भासू (५३) आणि चौरीकर यशवंत पंढरी (५२).

महिला राखीव गटातून श्रीमती शितल चंद्रशेखर मडावी (३८९) आणि श्रीमती मीनाक्षी अर्जुनराव वट्टी (३३४) यांची निवड झाली आहे. निर्णय अधिकारी संभाजी निकम यांनी हा निकाल जाहीर केला. आदिवासी विकास महामंडळाच्या सभागृहात ही मतमोजणी झाली.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com