Karanjkar Vs Balkawade News: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी भगूर आहे. या शहरात कोणत्याही स्थितीत भाजपची सत्ता हवीच, असा अट्टहास होता. मातृत्व आता गळून पडल्याने भाजपची कोंडी होण्याची चिन्हे आहे.
भाजपने स्वबळावर निवडणुकीचा प्रयत्न केला होता. त्याला फारसे यश आले नाही. सत्ताधारी महायुतीचा घटक असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने भाजपला अक्षरशा झिरकारले. त्यामुळे भाजपची स्वबळाची स्वप्ने पूर्ण होऊ शकलेली नाही.
शनिवारी भगूर नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसेने युती केल्याची घोषणा केली. दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एकत्र आला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने प्रेरणा बलकवडे यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जाहीर केले. शिवसेना शिंदे पक्षातर्फे माजी नगराध्यक्षा अनिता करंजकर या उमेदवार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बळकवडे विरुद्ध करंजकर अशी लढत स्पष्ट झाली आहे.
भगूरचा राजकारणात गेल्या चार निवडणुकांमध्ये शिवसेनेने कधीही भाजपला जवळ केले नाही. अगदी 1995 मध्ये राज्यात युती झाली मात्र भगूरला युती नव्हती. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर मध्ये भाजपला कधीही सत्ता मिळाली नाही. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.
गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे विजय करंजकर यांनी नगरपालिकेवर आपले वर्चस्व मजबूत केले आहे. यापूर्वीच्या तिन्ही निवडणुका त्यांनी एक हाती जिंकल्या. यंदाही त्यांनी मोठी तयारी केली आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एकत्र आला आहे. यामध्ये आमदार सरोज अहिरे यांची भूमिका आहे. भाजपच्या दीपक बलकवडे यांनी त्यासाठी टाळी दिली. मात्र ही युती कार्यकर्त्यांना पसंत पडली का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांची संपर्क केल्याचे बोलले जाते. यावेळी शिवसेना शिंदे पक्षाने उमेदवारी हवी असल्यास शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल अशी अट घातली आहे. या अटीलाही काही इच्छुकांनी तयारी दाखवली आहे.
त्यामुळे गेल्या तीन निवडणुकात झाले ते पुन्हा घडले आहे. नगरपालिका निवडणुकीत बळकवडे विरुद्ध करंजकर असा संघर्ष पुन्हा एकदा रंगणार आहे. त्यात कार्यकर्ते आणि मतदार काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरेल.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.