Maratha vs Obc : तुम्ही आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवताय का ? तुमची संस्कृती काय आहे, हे तुमच्या अनुभव आणि वयावरून लक्षात आले आहे. कोयते, कुऱ्हाडी, काठ्या, पाय तोडण्याच्या भाषा करत आहात. तुम्ही काय संस्कार शिकवणार राज्याला आणि आमचे संस्कार कशाला काढता. तुमचे तुम्ही बघा आणि आमचे आम्ही बघतो, अशा शब्दात मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांचा समाचार घेत त्यांची खिल्ली उडविली.
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या संस्कृतीविषयी वक्तव्य केले होते. त्यावरुन जरांगे-पाटील यांनी भुजबळांना प्रत्युत्तर रुग्णालयातूनच प्रत्त्युतर दिले. 'सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकायचा. भुजबळसाहेब तुम्ही सुधारा, नाहीतर तुम्हाला शॉक बसेल. शेवटी तुम्ही या राज्यातील एक अभ्यासू माणूस आहात. तुम्हाला झटका बसेल आणि बसला तर मला खूप टेन्शन येईल. मला खूप बेकार वाटत आहे'.
'खूप चांगला माणूस असून तुम्हाला काय झाले आहे ते तर सांगा म्हणून तुम्ही असे बरळत आहात. गिरीश महाजनसाहेबांना तीन वेळा सांगितले यांना फटकून द्या तर ऐकत नाहीत, अशा शब्दात जरांगे यांनी भुजबळांची खिल्ली उडविली. ते म्हणाले, तुम्ही नाही लढला तरी आम्ही राज्यातील गोरगरीब, धनगर, मुस्लीम, बंजारा बांधवांसाठी लढणार आहोत. तुम्ही आम्हाला काय संस्कृती शिकवता?
'तुमचे फक्त तिथे बसून उगाच गप्पा ठोकायचे काम आहे. धनगर बांधवांच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा, असे सांगितले होते. तुम्ही का केली नाही ? असा सवाल जरांगे-पाटील केला. तुम्ही फक्त गोरगरीबांचा वापर करून उगाच आमच्यात भांडणे लावत आहात. मराठा आणि ओबीसी बांधवांत भांडणे लावू नका. आमचे प्रेम तुटू शकत नाही किती पण प्रयत्न करा!'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शेवटी तुम्ही फक्त लोकांनी फेकलेली कागदच खाणार हे शंभर टक्के खरे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जरांगे यांच्या बीड येथील सभेवेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. यावरुन ते म्हणाले, त्याबद्दल मला फारसे माहीत नाही. पुष्पवृष्टी प्रदर्शनाच्या माध्यमातून सहलीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी केली होती. त्याचा आमच्याशी संबंध नाही.
त्यांचे आरोप खोटे आहेत, आम्हाला त्याचे काही वाटत नाही. मराठ्यांचा नाद करु नका कारण मराठे काहीही करू शकतात. तुम्हीच कसे लहान मुलाच्या बुद्धीचे बावचाळलेल्या विचाराचे आहात, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तर धनगर बांधवांच्या न्यायासाठी तुम्ही काही केले असते तर त्यांनी तुमची पाठ थोपटली असती, असेही जरांगे म्हणाले.
बलिदाने वाया जावू द्यायची नाहीत..
आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) बलिदाने गेली ती वाया जावू द्यायची नाहीत. संघर्ष करावाच लागणार आहे. आण्णासाहेब पाटलांपासून बलिदाने जात आली आहेत. परंतु सरकारमुळे हे बळी गेले आहेत. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त जणांचे बळी गेले आहेत, ती वेदना तर आमच्या काळजात कायमची राहणार आहे. त्यांचे आरक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे ठरवले असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.