Maharashtra Maratha Aarakshan : मनोज जरांगे-पाटील यांच्या कराडमधील सभेनंतर दोन दिवसांनी येथील पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांवर गुन्हा दाखल केला. पण तब्बल एक महिन्याने समन्वयकांना अटी-शर्तींसह नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे मराठा समाजाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले होते. या माध्यमातून 17 नोव्हेंबर रोजी कराडच्या (Karad) छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मध्यरात्री सभा झाली. त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांवर गुन्हा दाखल केला. परंतु त्याची नोटीस तब्बल एक महिन्याने पाठवली आहे.
इतक्या दिवसांनी अचानक आलेल्या नोटीसीमुळे समन्वयक बुचकुळ्यात पडले. त्यातच नोटीसीत अनेक अटी-शर्ती टाकल्या आहेत. मनोज जरांगे-पाटील यांची सभा शांततेत पार पडावी आणि पोलीस प्रशासनावर कोणताही ताण येवून नये म्हणून सभेदिवशी मराठा समाजाने पोलिस प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे शांततेत पार पाडली.
त्यानंतर कराड शहर पोलिसांनी 19 नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाच्या 14 समन्वयकांवर गुन्हे दाखल केले. त्या संदर्भात संबंधितांना कसलीही सूचना दिली नाही. थेट नोटीसा पाठवण्यात आल्या. बहुतांश जणांनी नोटीस स्वीकारली नाही. यासंदर्भात सोमवारी (25 डिसेंबर) चौकशीला बोलविले होते. मात्र, नोटीसा घेणारे आज चौकशीला गेले नाहीत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रकारामुळे मराठा समाज संतप्त झाल्याने कराड शहर पोलिसांनी 14 मराठा समन्वयकांवर केलेली कारवाई वादात सापडली आहे. गुन्हा दाखल केल्याची सूचना संबंधितांना एक महिन्याने नोटीस पाठवून दिली. त्यातच नोटीसमध्ये अटी-शर्ती घातल्यामुळे मराठा समाजात तीव्र संताप आहे.
गुरुवारी (28 डिसेंबर) शेकडोंच्या संख्येने मराठा समाज एकत्र येऊन कराड शहर पोलिस ठाण्यात जाणार आहेत. आम्हा सर्वांवर गुन्हे दाखल करा, असा पवित्रा त्याठिकाणी घेतला जाणार आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.