Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची काही दिवसांपूर्वी निवड झाली. बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला. जिल्हा बँकेत महाविकास आघाडीच्या संचालकांच संख्याबळ असतानाही घुलेंचा पराभव झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या हे चांगलच जिव्हारी लागलं.
त्यानंतर अजित पवार हे रविवारी (दि.26 मार्च) आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमासाठी अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी या कार्यक्रमात बोलताना पवारांनी जिल्हा बँकेत आघाडीला मतदान न करणाऱ्या संचालकांना थेट इशारा दिला. गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना असा झटका देईन की १० पिढ्या विसरणार नाही, असा स्पष्ट इशाराही अजितदादांनी दिला. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे जे संचालक फुटले त्यांचे टेन्शन वाढले आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय-काय घडलं? कसं घडलं? हे सर्व आपल्याला माहिती आहे. यामध्ये कुणी-कुणी शेण खाल्ले हे माहित आहे. गद्दारी करणाऱ्याला झटका देणारच, असा स्पष्ट इशारा अजित पवारांनी दिला. मात्र, या इशाऱ्यानंतर फुटलेल्या संचालकांच्या पोटात गोळा आल्याची चर्चा अहमदनगरच्या राजकारणात सुरू झाली आहे.
आता हे फुटलेले संचालक कोण-कोण आहेत? यामध्ये आजी-माजी आमदारही आहेत का? अशा वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात काय-काय राजकीय घडामोडी घडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.