Nashik News, 01 September : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेवरील विरोधकांची नाराजी संपलेली नाही. त्यामुळे भाजपही विरोधकांच्या आंदोलनामुळे चांगलाच अस्वस्थ झाल्याचं चित्र आहे. विरोधकांनी या प्रकरणी सत्ताधारी पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. तर या पुतळ्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) या प्रकरणी सातत्याने आंदोलन केली जात आहेत.
विरोधकांच्या आंदोलनाला भाजपकडून (BJP) देखील निषेध आंदोलन करून उत्तर देण्यात येत आहे. असंच आंदोलन भाजप नेत्या राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत नाशिक (Nashik) येथे भारतीय जनता पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं.
महाविकास आघाडीचे नेत्यांना सध्या फक्त महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारविरुद्ध पोटशूळ उठला आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना फक्त सत्ता हवी आहे. या सत्तेसाठी त्यांचा आटापिटा सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांनाच आदर आहे.
महाराज हे सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा अवमान करण्याचा विचार महायुतीच्या नेत्यांत आणि सरकारमध्ये चुकूनही येणार नाही. आता अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. आता यावर काय शिल्लक राहिलं?. कशासाठी विरोधक आंदोलन करीत आहेत? विरोधकांनी आता आंदोलन करण्याचे कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही.
त्यामुळे महाविकास आघाडीचे नेत्यांनी ताबडतोब आंदोलन थांबवावे. अन्यथा भारतीय जनता पक्षाला देखील त्याला उत्तर देता येईल. जनता महायुतीच्या बरोबर आहे. महायुती विरोधात आंदोलन करून राज्यातील राजकारण दूषित करण्याचे काम थांबवावे, असा इशारा राज्यमंत्री खडसे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार तसेच काँग्रेस नेते नाना पटेल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आमदार सीमा हिरे, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, महेश हिरे, नाना शिलेदार, रवी पाटील, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सोनाली ठाकरे, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार यांसह विविध नेते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.