Nandurbar: जि.प. अध्यक्षांसह सदस्य गेले तरी कुठे?

स्थायी समिती उपाध्यक्ष राम रघुवंशी, शिक्षण सभापती अजित नाईक दोघेच उपस्थित
Nandurbar Empty Zp Meeting Hall
Nandurbar Empty Zp Meeting HallSarkarnama
Published on
Updated on

नंदुरबार : जिल्हा परिषदेचा (ZP) अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ (Tenure) पूर्ण झाल्याने येत्या १७ ऑक्टोबरला नवीन पदाधिकारी निवडीसाठी सभा होणार आहे. (Meeting for new office bearers election) तत्पूर्वी मंगळवारी स्थायी समितीची सभा झाली. मात्र सभेला अध्यक्षांसह सभापती व सदस्यही अनुपस्थित होते. (ZP president, Vice president and members absent for standing committee meeting)

Nandurbar Empty Zp Meeting Hall
Chitra Wagh: `वरिष्ठ नेत्याने मला माझी जात विचारली होती`

या सभेला केवळ उपाध्यक्ष राम रघुवंशी व शिक्षण सभापती अजित नाईक उपस्थित होते. त्यांनी सभा अर्धा तास तहकूब केली. त्यानंतरही कोणी न आल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्षासह सारेच सदस्य गेले तरी कुठे? अशी एकच चर्चा जिल्हा परिषदेत रंगली होती.

Nandurbar Empty Zp Meeting Hall
Rohit Pawar: शासकीय यंत्रणाचा गैरवापरातून लोकशाहीची पायमल्ली!

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ तीन महिन्यापूर्वीच पूर्ण झाला. मात्र आरक्षणाचा मुद्यावरून तीन महिने शासनाने जैसे थे ठेवत मुदत वाढ दिली होती. मुदत वाढ संपल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सध्या तत्कालीन महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीची सत्ता आहे. मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपशी युती केली. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. जिल्हा परिषदेतील सत्तेतील शिवसेना शिंदे गटाची आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप यांची युती आहे. वरिष्ठांनी आदेश दिले तर भाजप व शिवसेनेची सत्ता बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र वरिष्ठांचे अद्याप आदेश नाहीत.

आघाडीच सत्तेत राहणार

मागील तीन महिन्यापूर्वी चंद्रकांत रघुवंशी व काँग्रेसचे नेते ॲड के. सी. पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या लेखी करार झाला आहे.त्यात पुढील अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता जैसे थे ठेवण्याचा ठरले आहे. त्यामुळे त्या करारानुसार जिल्हा परिषदेतील सत्ता महाविकास आघाडीची जैसे थे राहील. उपाध्यक्षही जैसे थे राहतील. मात्र अध्यक्षपदी कोण ? हा प्रश्‍न आहे. त्यामुळे सध्याच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनाच पुहा संधी की, काँग्रेसचे नेते ॲड के. सी. पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी यांना संधी मिळते किंवा अजून कुणाची वर्णी लागते. याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

सभा झालीच नाही

सत्तातंरासाठी विरोधकांकडून काही दगा फटका होऊ नये, म्हणून जिल्हा परिषद सदस्यांना सुरक्षित ठेवणे हा निवडणूक व्यूहरचनेचा भाग असतो. म्हणून आजची स्थायी समिती सभा असतानाही स्वतः अध्यक्षा सीमा वळवीसह काही सभापती व सदस्य यांनी बैठकीला दांडी मारली. अखेर सभा झालीच नाही. त्यामुळे त्यांना नक्कीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असावे, त्यामुळे दिवसभर जिल्हा परिषद व राजकीय वर्तुळात अध्यक्षांसह पदाधिकारी व सदस्य गेले तरी कुणीकडे ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com