Dhananjay Munde News : 'आता 'खान की बाण' विसरा अन् विकासाची 'जान'असणाऱ्याला निवडा' ; धनंजय मुंडेंचं आवाहन!

Parbhani Loksabha Constituency: स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असे या निवडणुकीला स्वरूप आले असले, तरी...
Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama
Published on
Updated on

'खान पाहिजे की बाण' या मुद्द्यावर निवडणुका लढवून जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना आता घरी बसवा. 'खान पाहिजे की बाण' विसरा आणि विकासाची जाण असणाऱ्या महादेव जानकरांना निवडा,असे आवाहन राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परभणीत केले.

महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद बैठकीत त्यांनी महाविकास आघाडीवर जातीयवादी राजकारणाचा आरोप करत टीकेची झोड उठवली. लोकसभेच्या परभणी मतदार संघामध्ये महायुतीचे महादेव जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यात काटे की टक्कर होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhananjay Munde
Dhananjay Munde News : शरद पवारांचा 'तो' शब्द ईश्वर पूर्ण करो; धनंजय मुंडे असं का म्हणाले?

स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असे या निवडणुकीला स्वरूप आले असले, तरी महायुतीने मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदू- मुस्लिम राजकारणावर मते मागितली जात असल्याचा आरोप केला आहे. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. बाळासाहेब ठाकरे यांच्या या पक्षाला राजकीय मान्यता आणि धनुष्यबाण हे चिन्ह परभणीकरांनीच दिले.

हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या या मतदारसंघात गद्दारीला थारा नसल्याचे ही अनेक निवडणुकांमधून स्पष्ट झाले आहे. राज्यात शिवसेना फुटली तेव्हा परभणीचे खासदार संजय जाधव मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. या निष्ठेचे फळ त्यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी देत दिले. मात्र संजय जाधव यांच्या हॅट्रिकला महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना परभणीतून उमेदवारी देत ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.

जानकर यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि महायुतीचे मराठवाड्यातील नेते परभणीत उपस्थित झाले होते. त्यानंतर आता जानकारांच्या प्रचारासाठी महायुतीतील घटक पक्षांचे मंत्रीही बैठका, मेळावे घेत आहेत.

आज परभणी शहरात आयोजित महायुती संवाद मेळाव्यास धनंजय मुंडे यांनी हजेरी लावत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. परभणी जिल्ह्याचे, विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी कोण इथला किंवा कोण बाहेरचा यापेक्षा विकासाची क्षमता कोणात आहे हे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Dhananjay Munde
Jalna Lok Sabha Election : 'रावसाहेब दानवेंचा अहंकार जनता नक्की उतरवणार'; काँग्रेस उमेदवार काळेंची टीका!

परभणी जिल्हावासीयांनी बाण की खान ही लढाई विसरून विकासाची 'जान' असलेल्या जानकरांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले. परभणीत येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच परभणी जिल्ह्यातील धनगर, ओबीसी मतदारांची लक्षणीय संख्या पाहता महादेव जानकर यांची उमेदवारी ठाकरे गटाच्या संजय जाधव यांच्यासाठी आव्हान ठरत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com