Mumbai Political News : एकेकाळी देशात अव्वल असलेल्या काँग्रेसची आज जी काय स्थिती झालेली आहे, ती होईल असे कधी कुणाला वाटले तरी होते का, असा प्रश्न उपस्थित करत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रात विरोधकांवर सीबीआय, ईडी, आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात येत आहेत. या धाडी जास्त काळ टिकणाऱ्या नसतात, त्या कधी ना कधी अंगावर उलटून येऊ शकतात, अशी टीका ठाकरे यांनी भाजपवर केली. (Latest Political News)
राज ठाकरे ठाण्यात मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात आगामी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच वाजपेयी यांच्या काळातील भाजप आणि आताची भाजप वेगळी असल्याचे मतदेखील त्यांनी या वेळी व्यक्त केले.
लोकसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे, चंद्रावर गेलेले यान लोक विसरलेत, वर्ल्डकप थोडीच लक्षात ठेवणार आहेत, असा टोला राज यांनी मोदी स्टेडियममधील फायनलवरून लगावला. यानंतर त्यांनी पदवीधर निवडणुकीवरून नाराजी व्यक्त केली.
'प्रमोद नवलकर जेव्हा उभे होते, तेव्हा त्यांनी उमेदवाराचा फॉर्म दाखविला होता. त्या उमेदवाराच्या फॉर्मच्या खाली सही किंवा अंगठा असे लिहिलेले होते. याला म्हणतात लोकशाही. पदवीधरांनी ज्या उमेदवाराला मतदान करायचे, तो शिकलेला असला पाहिजे अशी अट नाही. या पदवीधरांच्या मतांवर एक आमदार निवडून आणायचा, पण तो पदवीधर नसला तरी चालेल, अशी कोणती निवडणूक आहे,' असा सवाल राज ठाकरे यांनी केला. (Maharashtra Political News)
वाजपेयी यांच्या काळातील भाजप वेगळी होती. आताची भाजप वेगळी आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. काँग्रेसची आज काय अवस्था झालेली आहे. ती होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. धाडी जास्त काळ टिकणाऱ्या नसतात. त्या उलटून अंगावर येऊ शकतात, असा टोला भाजपला ठाकरे यांनी या वेळी लगावला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.