Mahajan Attack On Pawar-Thackeray : महाजनांचा पवार-ठाकरेंवर हल्लाबोल; ‘सत्ता असताना मराठा आरक्षण का दिले नाही?’

Jalna Maratha protest : यांचे प्रेम हे पुतणा मावशीचे आहे.
Girish Mahajan-Uddhav Thackeray-Sharad Pawar
Girish Mahajan-Uddhav Thackeray-Sharad PawarSarkarnama

Jalgaon News : शरद पवार यांच्या ५० वर्षांच्या कार्यकाळात, तर उद्धव ठाकरे यांच्या काळात अडीच वर्षे सत्ता असताना मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिले नाही. उलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिले. मात्र, आता विरोधकांना एवढा कळवळा का आला, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. (Why Pawar-Thackeray did not gave Maratha reservation when they in power : Girish Mahajan)

जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याबाबत विचालेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, की, जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाल्यानंतर आम्ही सर्व त्यांच्या संपर्कात होतो. मी स्वतःही त्यांच्या संपर्कात होतो. पण, काही करणास्तव आपला संपर्क होऊ शकला नाही आणि शुक्रवारी (ता. १ सप्टेंबर) दुपारी अचानक लाठीहल्ल्याची दुर्दैवी घटना घडली.

Girish Mahajan-Uddhav Thackeray-Sharad Pawar
Sharad Pawar on Jalna Laticharge : पोलिसांना फडणवीसांचा फोन होता का? पवार म्हणतात ‘मी ज्योतिषी नाही...’

वास्तविक ही घटना घडायला नको होती, परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी जे दोषी असतील, त्यांच्यावर निश्‍चित कारवाई करण्यात येईल. सरकारला उपोषणकर्त्यांचा जीव वाचविणे महत्वाचे होते. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या जीवाचे बरेवाईट होण्याचा धोका होता, त्यामुळे त्यांचे उपोषण सोडविणे महत्वाचे होते. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते.

Girish Mahajan-Uddhav Thackeray-Sharad Pawar
Shivajirao Pandit Allegation On Govt : माजी मंत्री शिवाजीराव पंडितांचा सरकारवर गंभीर आरोप; ‘पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन...’

विरोधकांना एवढा कळवळा आत्ताच का?

लाठीहल्ल्याची घटना दुर्दैवीच आहे. परंतु, मराठा समाजासाठी काहीही न करणाऱ्या विरोधकांना एवढा कळवळ आताच कसा आला, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, शरद पवार गेली पन्नास वर्षे सत्तेत होते,त्यांनी आरक्षण दिले नाही. उलट ते म्हणाले होते, मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे? त्यांच्या त्या वक्तव्याची माझ्याकडे क्लीप आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अडीच वर्षे सत्तेत होते, त्यावेळी त्यांनीही आरक्षणासाठी प्रयत्न केले नाही. त्यावेळी ते कधीही घराच्या बाहेर निघाले नाहीत. आता आंदोलकांना भेटायला निघाले आहेत. यांचे प्रेम हे पुतणा मावशीचे आहे.

Girish Mahajan-Uddhav Thackeray-Sharad Pawar
Udayanraje Meet Maratha Agitation : अधिकाऱ्यांना निलंबित करा अन॒ लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी लावा; उदयनराजेंनी घेतली मराठा आंदोलकांची भेट

देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले

उलट, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र, सत्ता असताना विरोधकांना ते न्यायालयात टिकविता आले नाही. त्यांनी त्यासाठी चांगला वकिल देण्याचा प्रयत्न केला नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com