Ahmednagar Politics: नगर जिल्ह्यात तणाव का वाढतोय? खासदार सुजय विखेंनी सांगितलं 'हे' कारण

Sujay Vikhe: खासदार सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना हे भाष्य केलं
Sujay Vikhe
Sujay VikheSarkarnama

Ahmednagar: अहमदनगरमधील शेवगाव, संगमनेर, समनापूर, नगर शहर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी जातीय तणाव निर्माण होणाऱ्या घटना घडल्या. याबरोबरच 'लव्ह जिहाद'च्या घटनांच्या आरोपांमुळे जिल्ह्यातील सामाजिक वातावरण बिघडले असल्याचे मत खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले.

"पोलिसांनी दक्ष होत, कॉम्बिग ऑपरशेन राबवत शिक्षण, नोकरी निमित्ताने बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या लोकांचा तपास करत माहिती घेतली पाहिजे. जिल्ह्यातील सामाजिक तणावाच्या वाढत्या घटना पाहता बाहेरून आलेल्यामुळे घटना वाढत तर नाहीत ना?", असा सवाल खासदार सुजय विखे यांनी उपस्थित केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

Sujay Vikhe
Sharad Pawar In Action News : बैठकीत जालना लोकसभा मतदारसंघावर दावा अन् पवार थेट जिल्ह्यात...

केंद्रात मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्क अभियान सुरू आहे. या अभियानाच्या माध्यमातून नऊ वर्षात मोदी सरकारने राबवलेल्या विविध योजना आणि सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय, याबरोबरच त्याचा जनतेला झालेला फायदा, याबाबत आयोजित केलेल्या 'मोदी@9' अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्यात सातत्याने सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या घटना का घडत आहेत? यावर विचारलेल्या प्रश्नावर सुजय विखे यांनी हे उत्तर दिले.

Sujay Vikhe
Ajit Pawar News : कोल्हापुरातील राड्यानंतर अजित पवारांचा खळबळजनक विधान; '' निवडणुका समोर ठेवून राज्यात दंगली...''

तणाव वाढवणाऱ्या घटनांनंतर ठीक ठिकाणी निघणारे हिंदू समाजाचे मोर्चे पाहता आणि त्याद्वारे 'हिंदू समाज खतरे में' असल्याचे बोलले जात असताना आपल्याला काय वाटते असे विचारल्यावर खासदार सुजय विखे यांनी हिंदू समाज खतरे में नसून काहीसा असुरक्षित आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

"राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते, त्यावेळी हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असतानाही नागरिकांना यावर न्याय मिळाला नाही. सरकार आपल्याला न्याय देणार नाही, अशी त्यांची भावना सरकारच्या कारभारावरून दिसून आली", असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

Sujay Vikhe
Gondia News : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांच्या विरोधात सरसावला एक गट, नाना स्वतः घेणार क्लास !

दरम्यान, एक वर्षांपूर्वी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आता नागरिक मोकळ्या मनाने सरकारसमोर आपली भूमिका मांडत असून रस्त्यावर येत आहेत. मात्र, यामुळे हिंदू खतरे मे नाही. मात्र, तो कुठेतरी असुरक्षित आहे, ही भावना हिंदू समाजातून व्यक्त होत असल्याचं खासदार विखे यांनी म्हटलं. पण देशात आणि राज्यात आता भाजपचं सरकार असल्याने सर्वांना योग्य पद्धतीने न्याय दिला जाईल, असंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com