गिरीश महाजनांचे पाचशे कोटी सत्कारणी लागलेत का?

शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे मोरे यांचा पालकमंत्री गिरीश महाजनांना प्रश्‍न
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

धुळे : महापालिकेच्या (Dhule) गेल्या निवडणुकीवेळी (NMC election) वैद्यकीय शिक्षण व पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शहर विकासासाठी पाचशे कोटींचा निधी देऊ, अशा शब्द दिला. त्यानुसार निधी मिळाल्याने त्यांचे आभार मानतो. परंतु, हा निधी सत्कारणी लागला का? याचे मूल्यमापन कोण करणार, असा प्रश्‍न शिवसेनेच्या (Shivsena Shinde Group) शिंदे गटाचे महानगरप्रमुख मनोज मोरे यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. (Shivsena Eknath Shinde group criticise BJP`s leader inDhule)

Girish Mahajan
...आणि त्यांनी चक्क खासदारांच्या कानशीलात लगावली!

श्री. मोरे यांच्या पत्रकाचा आशय असा : जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री महाजन यांनी निधी वाटप व विकास कामातील भ्रष्टाचार मोडीत काढू, अशी भूमिका मांडली. तिचे स्वागत आहे. परंतु, शहरात निधीच्या अपहारातून निकृष्ट दर्जाची झालेली कामे बाळासाहेबांची शिवसेना दाखवेल, त्यानंतर पालकमंत्री योग्य ती कारवाई करणार का?.

Girish Mahajan
शिवसेनेच्या व्यासपीठावर `राष्ट्रवादी`ची तुफान फटकेबाजी

धुळेकर जनता पालकमंत्र्यांना डोक्यावर घेतील. निवडणुकीवेळी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे शहराचे सिंगापूर होणार होते. मात्र, शहर खड्डेपूर झाले. असे असताना पालकमंत्र्यांनी सडेतोड मांडलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे धुळेकरांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

निकृष्ट कामे चालणार नाही, रस्ता वाहून गेला, बांधकामाला गळती लागल्याची तक्रारही चालणार नाही. चिरीमिरीतून कामे होऊ नये. थातूरमातूर मलमपट्टीतून निधीचा अपहार खपवून घेतला जाणार नाही, कुणाशी संबंधित किंवा नेत्यांचा जवळचा ठेकेदार असला म्हणून निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही, अशी पालकमंत्र्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. असे असताना शहर विकासासाठी दिलेल्या पाचशे कोटींच्या निधीचा विनियोग सिंगापूरच्या दिशेने जाण्याऐवजी खड्डेपूरकडे गेला, असा आरोप आहे.

शहर भकास आणि मनपाच्या गैरकारभारामुळे धुळेकर नरकयातना भोगत आहेत. रस्ते, गटारी, स्वच्छ्तेचा प्रश्‍न आणि मुबलक जलसाठा असूनही पाण्यासाठी धुळेकरांची भटकंती सुरू आहे. अनेक नेतेच ठेकेदार झाले आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी मनपाकडे लाख दोन लाख रुपये शिल्लक नाहीत. त्यामुळे पाचशे कोटींचे काय झाले याचा शोध घेण्याची मागणी आहे. दादागिरी, गुंडगिरी आणि अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत, असेही पालकमंत्र्यांनी म्हटले आहे. या भूमिकेला बाळासाहेबांची शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे श्री. मोरे यांनी म्हटले आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com