Uddhav Thackeray : ठाकरेंनी भरसभेत 'तो' ऑडिओ ऐकवला, फडणवीसांच्या 'त्या' मागणीची केली पोलखोल

देवेंद्रजी जनाची नाही निदान मनाची तरी बाळगा असा हल्लाबोल ऊध्दव ठाकरे यांनी फडणवीसांवर केला आहे.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav ThackeraySarkarnama

महाराष्ट्रातील शेतकर्याचे मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी शेतकर्यांच्या वीजबिल माफीची मागणी केली होती. मात्र, आता सत्तेत आलं की त्यांची भाषा बदलली. पण आता मी विरोधात आहे आणि तुम्ही सत्तेत आहात. आता मी तुम्हांला खुलं आव्हान देतो की,मध्यप्रदेशच्या धर्तीवर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकर्याचे वीजबिल माफ करुन दाखवा. पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली सुरु आहे. देवेंद्रजी जनाची नाही निदान मनाची तरी बाळगा असा हल्लाबोल ऊध्दव ठाकरे यांनी फडणवीसांवर केला आहे.

ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे ( Udhhav Thackeray) हे बुलढाण्यातील चिखली येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते. त्यांनी या सभेत राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली. यावेळी ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा शेतकर्यांच्या वीजबिल माफीसंबंधीचा एक जुना ऑडिओ ऐकवला. यात फडणवीस यांनी मध्यप्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील वीज बिल माफ करावे अशी मागणी केली होती. तसेच सावकारी पद्धतीने वीज बिल वसूल केले जात आहे असे म्हटले होते? पण आता राज्यातील शेतकऱ्याला तुम्ही वीजबिल मुक्त करावं असं आव्हान फडणवीसांना केलं आहे. ( Uddhav Thackeray latest News)

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Raosaheb Danve : '' उद्या निवडणुका अन् आपण एकटेच आहोत..'' ; दानवेंकडून पुन्हा मध्यावधीचे संकेत?

तो आपलं भविष्य काय ठरवणार?

मुख्यमंत्री आणि शिंदे गटाच्या गुवाहाटी दौर्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, ते आज नवस गुवाहाटीला फेडायला गेले आहेत. गेल्या आठवड्यात स्वतःचा हात दाखवायला गेले होते. म्हणजे ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही तो आपलं भविष्य काय ठरवणार आहे. त्यांची हातसफाई संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यांचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही. त्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसले आहेत. तेच तुमचे मायबाप आहेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं असा टोलाही ठाकरेंनी यावेळी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
आधी प्रदेशाध्यक्ष, नंतर मुख्यमंत्री अन् आता प्रभारी; घायाळ काँग्रेसनं उचललं मोठं पाऊल

तुमचा कपाळावरचा गद्दारीचा शिक्का आयुष्यभर पुसला जाणार नाही

आज जो भाजपा आहे तो आयात पक्ष, भाकड पक्ष झालेला आहे. आज तुम्ही काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पक्षाची यादी पाहिली तर त्यात दिसेल की आयात ऊमेदवारांची नावे समोर येईल. आणि या आयात ऊमेदवारांना पुढे करुन जी काही हूकूमशाही सुरु आहे ती उलथवण्यासाठी आम्ही त्वेषाने उभ आहोत असेही ठाकरे यावेळी म्हणाले. गद्दारांत मर्दानगी असेल तर त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणुका लढवून दाखवावी. चेहरा बाळासाहेंबाचा वापरायचा, नाव, चिन्हं असं सगळं आमचं वापरायचं आणि पक्षाशीच गद्दारी करायची. पण तुमच्या कपाळीचा गद्दारीचा शिक्का आयुष्यभर पुसला जाणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com