आमदार गिरीश महाजन यांच्याविरुद्ध ईडीकडे तक्रार करू!

धुळे येथे मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले.
NCP Agitation at Dhule
NCP Agitation at DhuleSarkarnama
Published on
Updated on

धुळे : ईडीने (ED) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली. या प्रकरणी केंद्रातील मोदी सरकारविरोधात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Government) राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केले. त्यावेळी भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याविरुद्ध ईडीकडे तक्रार केली असून लवकरच भाजपच्या मोठ्या नेत्याविरुद्धही तक्रार केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी आंदोलनावेळी दिली.

NCP Agitation at Dhule
दर आठवड्याला भाजपचे ५ नगरसेवक शिवसेनेत येतील?

यावेळी आंदोलकांनी मंत्री मलिक यांच्या अटकेचा व केंद्रीय मोदी सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. ईडी केंद्राच्या दडपणाखाली कारवाई करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. माजी आमदार गोटे म्हणाले, की मंत्री मलिक यांनी भाजपचा खरा चेहरा उघड करण्यास सुरवात केली. त्याची भिती वाटू लागल्याने त्यांना अटक केली. तसेच मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे भाजप डर्टी पॉलिटीक्स करीत आहे. विरोधक आमदार गिरीश महाजन यांच्याविरूद्ध तक्रार केली आहे. पुढील आठवड्यात राज्यातील भाजपच्या मोठ्या नेत्याविरूद्ध ईडीकडे तक्रार करणार आहे, असे श्री. गोटे यांनी सांगितले.

NCP Agitation at Dhule
शहराध्यक्षांच्या नाकर्तेपणामुळे मी भाजप सोडला!

श्री. गोटे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्र्यांवर टीका केली. भाजपचा राज्यातील बडा नेता भ्रष्टाचारी असल्याचा ठपका मोदी सरकारने ठेवला असून सुमारे सहाशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे केंद्र सरकारच्या अहवालात नमूद आहे. या प्रकरणी दिल्लीचे विशेष पथक चौकशी आले होते. त्याचा आता सोक्षमोक्ष लावला जाईल, असे श्री. गोटे म्हणाले. केंद्राच्या दडपशाहीला घाबरणार नसून संघर्ष करू, असा इशारा आंदोलकांनी दिला.

यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना वगळता आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर, रमेश श्रीखंडे, गणेश गर्दे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, शहराध्यक्ष रणजित भोसले, तसेच आघाडीचे प्रमोद सिसोदे, मुज्जफर हुसेन, राजेंद्र चितोडकर, प्रमोद साळुंखे, प्रशांत भदाणे, कैलास चौधरी, अशोक सुडके, कुणाल पवार, राजू चौधरी, कमलेश देवरे, वामन मोहिते, जमीर शेख, शकील अन्सारी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com