Dr Rahul Aher Politics: मंत्री होण्याचे डॉ राहुल आहेरांचे स्वप्न भाजप पूर्ण करणार का?

Upcoming BJP cabinet expansion : भाजपच्या मंत्रिमंडळ विस्तारात नाशिकच्या आमदार डॉ राहुल आहेर यांचीही फिल्डिंग
Mla Rahul Aher
Mla Rahul AherSarkarnama
Published on
Updated on

BJP Cabinet Expansion News : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनेक भाजप आमदारांनी फिल्डिंग लावली आहे. यामध्ये नाशिक जिल्हा देखील पाठीमागे नाही.

नाशिक जिल्ह्यातून भाजपच्या आमदारही त्यासाठी प्रयत्नशील आहेत. नाशिक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार आहेत. यामध्ये तीन आमदारांची ही दुसरी टर्म आहे. यामध्ये डॉ राहुल आहेर, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांचा समावेश आहे. त्यामुळे हे तिघेही मंत्रीपदासाठी दावेदार मानले जातात.

यापूर्वी अपेक्षित असलेला मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी संपर्क असल्याने आमदार डॉ आहेर आहे यांचे नाव चर्चेत होते. मात्र राज्यातील महायुतीच्या बदललेल्या संदर्भात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्राधान्य देण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांना थांबावे लागले होते. सध्या मात्र आमदार डॉ आहेर इच्छुक आहेत. यांनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क सुरू केला आहे.

Mla Rahul Aher
Vivek Kolhe Vs Kishore Darade : विवेक कोल्हेंचा आमदार दराडेंना सज्जड दम; 'बाप दाखवा नाहीतर...'

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात ते एक प्रमुख इच्छुक आहेत. चांदवड विधानसभा मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा आमदार आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाला स्थान देण्यासाठी त्यांचे नाव चर्चेत आलेले आहे. या संदर्भात स्वतः डॉ. आहेर यांनी मात्र कमालीची गुप्तता बाळगली आहे. या विषयावर बोलण्यास देखील त्यांनी नकार दिला आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांना संधी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

Mla Rahul Aher
Prataprao Chikhlikar : लोकसभा पराभवाचे साईड इफेक्ट ; भाजपचे पदाधिकारी हमरीतुमरीवर...

मंत्रिमंडळ विस्तारात सध्या आमदार देवयानी फरांदे आणि आमदार डॉ आहेर या दोघांचीही नावे घेतली जात आहेत. या संदर्भात पक्षाकडून आगामी विधानसभा डोळ्यापुढे ठेवून निर्णय होणार आहे. त्यात भौगोलिक समतोल साधण्यासाठी भाजपचे पाच आमदार असूनही नाशिकची (Nashik) पाटी कोरीच आहे. त्यामुळे ही संधी वाया जाऊ नये म्हणून आमदार फरांदे आणि आमदार आहेर दोघेही जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यांना स्थानिक नेत्यांचेही सहकार्य मिळत आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com