Prataprao Chikhlikar : लोकसभा पराभवाचे साईड इफेक्ट ; भाजपचे पदाधिकारी हमरीतुमरीवर...

BJP Leader Prataprao Chikhlikar : भाजपचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि बालाजी पुयड यांच्यात जाहीर कार्यक्रमात वादावादी झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. विशेष म्हणजे या बैठकीत माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर उपस्थित होते.
Nanded Lok Sabha Constituency
Nanded Lok Sabha Constituency Sarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील पराभवानंतर भाजपमध्ये याचे स्थानिक पातळीवर पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याभरात स्वतः प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोघांनी माझे काम केले नाही त्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही, असे म्हणत दम भरला होता. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा नांदेड मध्ये बोलावण्यात आलेल्या एका भाजपच्या बैठकीत दोन पदाधिकारी एकमेकांना भिडल्याचे दिसून आले.

चिखलीकर यांच्यासमोरच घडलेल्या या प्रकारानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात पक्षाचा झालेला पराभव हा अंतर्गत गटबाजीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे बोले जात आहे. भाजपचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि बालाजी पुयड यांच्यात जाहीर कार्यक्रमात वादावादी झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. विशेष म्हणजे या बैठकीत माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर उपस्थित होते.

बैठकीत दिलीप कंदकुर्ते भाषणासाठी उभे राहिले तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये बसलेल्या बालाजी पुयड यांनी त्यांना रोखत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. कुंदकर्ते यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे काम केले नाही, त्यांचा राजीनामा घ्या आणि कारवाई करा, अशी मागणी करत त्यांना बैठकीत बोलण्याचा अधिकार नसल्याचे म्हणत आरोप केला.

Nanded Lok Sabha Constituency
Narhari Zirwal : नरहरी झिरवाळ यांचा शरद पवारांकडे ओढा ! अजित पवार गटात होतेय घुसमट ?

त्याला कुंदकर्ते यांनी ही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र बैठकीत अधिकच गोंधळ वाढत असल्याने चिखलीकर यांनी मध्यस्थी करत या दोघांनाही रोखले. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नांदेडमध्ये महायुतीत विशेषत भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे.

स्वतः चिखलीकर यांनी भाजपने पक्षात काही लोकांना लायकी नसताना मोठे केलं, त्यांना पद दिली त्यांनीच निवडणुकीत पक्षाचे काम केले नाही, असा आरोप केला होता. ज्या एक -दोन जणांनी लोकसभा निवडणुकीत माझे काम केले नाही त्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही, असा इशाराही चिखलीकर यांनी एका बैठकीत दिला होता.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड लोकसभेची जागा महायुती सहजपणे जिंकेल असा आत्मविश्वास भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना होता.

मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत वेगळाच निकाल लागला. चिखलीकर यांनी स्वतः अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी गाफील राहिले, अति आत्मविश्वास त्यांना नडला आणि माझा पराभव झाला,अशी कबुली दिली होती.

Nanded Lok Sabha Constituency
Sandipan Bhumre : शिंदेंचे खासदार संदिपान भुमरे 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरेंचे मानले आभार

शिवाय आपल्या पराभवामुळे अशोक चव्हाण यांची केंद्रातील मंत्रिमंडळात संधी हुकली, असेही म्हटले होते. एकूणच नांदेड लोकसभेतील पराभव भाजपच्या विशेषत प्रताप पाटील चिखलीकर यांच्या चांगला जिव्हारी लागला आहे.

मराठा आरक्षण आणि केंद्रात 400 पार झाल्यानंतर भाजप संविधान बदलणार या महाविकास आघाडीने केलेल्या प्रचारामुळे मराठवाड्यात व महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला, असा निष्कर्ष प्राथमिक पाहणी मधून काढला जात आहे.

याशिवाय भाजपने नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नेमणूक केली आहे. आता त्यांच्या पाहणीतून आणि निष्कर्षातून पराभवाची नवी कोणती कारणे पुढे येतात? ते पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com