Nashik Drugs News : ड्रग्ज माफिया ललित पानपाटीलचा भाऊ भूषण याने पोलिसांच्या कारवाईनंतर गिरणा नदीपात्रात फेकून दिलेल्या ड्रग्जचा शोध मुंबई पोलिसांनी आज घेतला. यामध्ये पहिल्या मोहिमेत त्यांमा १५ कोटींचे ड्रग्ज हाती लागले आहे. (Mumbai Police take search drive on the basis of Bhushan Patil)
साकीनाका (मुंबई) पोलिसांनी सकाळी गिरणा नदीपात्रात देवळा येथे भूषण पानपाटील याने दिलेल्या माहितीच्या आधारे शोध मोहीम हाती घेतली. त्यात आज पहाटे १५ किलो ड्रग्ज पहिल्या टप्प्यात सापडले. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. या अवैध धंद्याची पाळेमुळे नाशिकच्या देवळा सारख्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याचे यातून स्पष्ट झाले.
ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा चालक व साथीदार सचिन वाघ याने नाशिकच्या कारखानामध्ये बनविलेले ड्रग्ज नष्ट करण्यासाठी गिरणा नदीपात्रात फेकून दिले होते. सचिन वाघच्या तपासात ही माहिती उघडकीस आल्यानंतर मुबंई (साकीनाका) पोलिसांनी सचिन वाघला सोबत घेऊन मध्यरात्री अडीच वाजता देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली. त्यांच्या मदतीला रायगडमधील प्रशिक्षित पानबुडे पथक मध्यरात्रीपासून शोधकार्य करीत आहेत.
सटवाईवाडी (देवळा) परिसरात आतापर्यंत १५ किलो ड्रग्ज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अन्य ड्रग्ज नदीपात्रात फेकल्याचे वाघने सांगितल्याने कॅमेऱ्याच्या माध्यमातून ड्रग्जचा शोध घेतला जात आहे. साधारण १५ फूट खोल पाणी तपासात अडचणी येत आहेत.
पानपाटीलचा चालक सचिन वाघ हा देवळा तालुक्यातील पिंपळगाव (वा.) येथील आहे. त्याने नातेवाईकांच्या माध्यमातून ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतूने ही जागा निवडल्या असाव्यात असा अंदाज आहे. पंधरा दिवसांपूर्वी शिंदे (नाशिक) येथे मुंबई पोलिसांनी ड्रग्ज कारखाना उध्वस्त केला. त्यानंतर विविध भागात कारवाई करत पोलिसांनी कोट्यवधींचे ड्रग्ज हस्तगत केले. ही मोहिम अद्याप सुरी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.