Teachers Politics : गुरुजी पुन्हा ‘पैठणी’ अन् ‘पेशवाई’च्या जाळ्यात अडकणार का?

Will the teachers get a chance in the election of the teacher`s constituency- शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदार नोंदणीसाठी संस्थाचालकांनी शिक्षकांना कामाला जुंपले...
Teachers constituency
Teachers constituencySarkarnama
Published on
Updated on

Teachers constituency election politics : शिक्षकांना आपले प्रश्न विधिमंडळात मांडण्याची संधी मिळावी, यासाठी शिक्षक मतदारसंघांची रचना करण्यात आली आहे. मात्र, शिक्षक नव्हे तर संस्थाचालक राजकीय नेतेच या मतदारसंघांच्या निवडणुकीत उतरू लागले आहेत. आगामी निवडणुकीत तरी शिक्षक शिक्षकाला निवडण्याची संधी घेणार का? याची उत्सुकता आहे. (Whether teachers will take a freedom in LMC Upcoming election)

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या (Teachers) निवडणुकीच्या (Election) मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गत निवडणुकीत त्यात शिवसेना, (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपाने (BJP) थेट उमेदवार दिले होते.

Teachers constituency
NCP Dhule News : `राष्ट्रवादी`मध्येच प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळेल

त्या -त्या वर्गांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी विधान परिषदेत शिक्षक, पदवीधर तसेच अन्य काही घटकांसाठी प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. त्यात बिगरराजकीय संस्थांनी सहभागी होणे अपेक्षित आहे. गेली काही वर्षे हे बंधन पाळले जात होते. मात्र, गेल्या काही निवडणुकीत हा संकेत मतदार आणि राजकीय पक्ष दोन्हींकडून मोडण्यात आला आहे.

आज (ता.३०) मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला आहे. ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. सामान्यतः पुढील वर्षी जून महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे. त्यादृष्टीने शिक्षकांना उत्सुकता लागली आहे. उत्सुकता याची, की गेल्या वर्षी एका उमेदवाराने चक्क आपल्या संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना कामाला जुंपले होते. त्यांनी प्रत्येक शिक्षक मतदाराच्या घरी पैठणी आणि गोड-धोड पदार्थ पोहोचवले होते. एरवी ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा अशी अपेक्षा असते, त्या शिक्षकांनी त्या पैठणी स्वीकारल्या. उमेदवारास मतदानदेखील केले. तो उमेदवार निवडून आला.

असाच ओंगाळवाणा प्रयोग अमरावती मतदारसंघात त्यावेळी चर्चेत अलेली पेशवाई साडी वाटून एक उमेदवार विजयी झाला होता. त्याने चक्क निसर्गकवी ना. धों. महानोर यांचा धक्कादायक पराभव केला होता. त्यामुळे किमान आगामी निवडणुकीत तरी शिक्षक पैठणी, पेशवाई किंवा यांसारख्या कुठल्या तरी नव्या आमिषाला बळी पडतात, की पेशाशी एकनिष्ठ राहून शिक्षक असलेल्या उमेदवारालाच पसंती देतात, याची चर्चा सुरू झाली आहे.

Teachers constituency
Shivsena Dasara Melava 2023 : शिवाजी पार्कवर दसऱ्याला आव्वाज कुणाचा? ठाकरे गटाकडून सावध भूमिका घेत अर्ज दाखल

नाशिक विभाग मतदारसंघात नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नगर हे पाच जिल्हे आहेत. गतवर्षी शिवसेनेशी संबंधित मात्र अपक्ष किशोर दराडे, राष्ट्रवादी पुरस्कृत संदीप बेंडसे, भाजप पुरस्कृत अनिकेत पाटील हे संस्थाचालक प्रमुख उमेदवार होते. यंदा टीडीएफकडून माजी आमदार नाना बोरस्ते आपली उमेदवारी पुढे दामटत आहेत. मात्र, संदीप गुळवे, राष्ट्र सेवा दलाचे अर्जुन कोकाटे (शिक्षक भारती) हे अन्य संभाव्य उमेदवार आहेत. या सर्व धामधुमीत उमेदवार कोण, यापेक्षा शिक्षक किती तत्त्वशील राहतील, याचीच चर्चा आहे.

Teachers constituency
BJP MLA Sawarkar News : अभियंत्याला झापताच भुयारीमार्ग सुरू; आमदार साहेब, आता त्या ‘झंडू’लाही झापा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com