मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास मी आणि माझ्या सहकारी तीन नगरसेविका तुमच्या पक्षात बिनशर्त प्रवेश करू, अशी अनोखी ऑफर शिवसेनेच्या (Shivsena) नाशिकच्या (Nashik) नगरसेविका किरण दराडे (Kiran Darade) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिली आहे. त्यामुळे किरण दराडे यांच्या पत्राची सोशल मीडियात प्रचंड चर्चा आहे. (Withdraw the charges against Raut-Awhad; We join your party: kiran darade)
राज्यातील विराेधी पक्षांच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांवर वारंवार होत आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांना जामीन देताना न्यायालयाने नेांदविलेले निरीक्षण आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेले गुन्ह यामुळे राजकीय आकसापोटी विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यानंतर दराडे यांचे हे पत्र सोशल मीडियातून प्रचंड व्हायरल होत आहे.
नगरसेविका किरण दराडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री महोदय गेल्या चार दिवसांत जितेंद्र आव्हाड यांच्यावर व्यक्तीगत दोष मनात धरून दोन खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना तुरुंगात डांबले. त्याचप्रमाणे खासदार संजय राऊत यांना बेकायदेशीर अटक केली. हे सर्व प्रकार निषेधार्ह आहे.
खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास आपला सन्मान करत मी नगरसेविका किरण दराडे आणि माझ्या तीन सहकारी नगरसेविका आम्ही बिनशर्त शिंदे गटात तत्काळ धूमधडाक्यात प्रवेश करू. जय महाराष्ट्र! अशी खुली ऑफरच नगरसेविका दराडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने लिहिलेले हे पत्र सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे. त्याची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे. नगरसेविका दराडे यांची ऑफरवर मुख्यमंत्री शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.