नाशिकच्या ‘स्मार्टसिटी’च्या कामाची चौकशी करा

शहर काँग्रेस सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय महसूल अधिकारी कार्यालयात निवेदन दिले.
Congress workers at Commissioner office
Congress workers at Commissioner officeSarkarnama

नाशिक : शहरात (Nashik) सुरू असलेले स्मार्टसिटीचे (Smart City) काम निकृष्ट (Poor Quality) आणि चुकीच्या पद्धतीने होत आहे. अशा कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शहर काँग्रेस सेवादलातर्फे (Congress Sevadal) करण्यात आली आहे. याबाबत विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधींकडे निवेदन देण्यात आले. (Divisional Revenue Commissioner assures Congress sevadal Office bearers)

Congress workers at Commissioner office
कारवाई टाळण्यासाठी शिक्षकाकडे लाच मागणारा मुख्याध्यापक अडकला जाळ्यात

नाशिक शहरात विविध भागात एकाचवेळी अनेक कामे सुरु आहेत. यातील अनेक कामे कोणतेही नियोजन न करता होत असल्याचे स्पष्ट दिसते. एक काम पूर्ण झाल्यावर पुन्हा नव्याने केले जाते. अनेकदा प्रदिर्घ काळ कामे रेंगाळतात. त्यामुळे रस्ते बंद केले जातात. वाहतूकीची समस्या निर्माण होते. नागरिकांची गैरसोय होते. मात्र त्याबाबत स्मार्ट सिटी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते.

Congress workers at Commissioner office
`ओडिशा`च्या प्रमाणे राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या!

सतत मागणी करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. स्मार्टसिटीअंतर्गत ठेकेदारांना काम दिले आहे. त्यांच्याकडून मनमानी कारभार करत धार्मिक शहराची ओळख पुसल्या जाऊ नये. स्मार्टसिटी अंतर्गत शहराचा विकास होईल, अशी कामे नाशिककरांना अपेक्षित आहे. शहरवासीयांच्या भावना लक्षात घेऊन सर्व कामांची सखोल उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.

या वेळी सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, दिनेश निकाळे, सिद्धार्थ गांगुर्डे, उमेश चव्हाण, धोंडिराम बोडके, कामील इनामदार, मंगेश बनसोडे, संतोष हिवाळे, मनोज करमासे, विजू आहेर, इब्राहिम शेख, अजीज खान आदी उपस्थित होते.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com