Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांनी निर्णय बदलला का? शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून लढणार...

Maharashtra Politics : येवला की माझगाव मतदारसंघातून लढणार, याबाबत संभ्रम निर्माण केला आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ हे आगामी विधानसभा निवडणूक येवला मतदारसंघातून लढविणार की नाही, याबाबत अजून स्पष्टता दिसत नाही. गमावलेल्या माझगाव मतदारसंघाकडेही त्यांचे लक्ष असल्याचे दिसते. भुजबळांनी सूचक विधान करीत येवला की, माझगाव मतदारसंघातून लढणार, याबाबत मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे.

माझगाव मतदारसंघावर आपले लक्ष आहे का, असा प्रश्न आज (शनिवार) भुजबळांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. येवला आणि माझगाव दोन्ही मतदारसंघांकडे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड करण्यात आल्याने छगन भुजबळ हे माझगावमधून लढणार अशा चर्चा सुरू आहेत.

Chhagan Bhujbal
Dheeraj Lingade News : काय सांगता? काँग्रेस आमदार पोलिस ठाण्यासमोर थाटणार मटक्याचं दुकान? नेमकं काय झालं ?

कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या भुजबळांचा राजकीय जीवनप्रवास हा मुंबईतून सुरू झाला. शिवसेनेचा ढाण्या वाघ समजले जाणारे भुजबळ १९७३ मध्ये महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९७३ ते १९८४ दरम्यान ते महापालिकेत विरोधी पक्षनेता होते. १९८५ ला मुंबई महापालिकेवर भगवा फडकला अन् भुजबळ हे महापौर झाले.

१९८५ व १९९० अशा दोन विधानसभा निवडणुका त्यांनी मुंबईतील माझगावमधून लढल्या. ते आमदार झाले. विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळेल, अशी चर्चा असताना मनोहर जोशींची या पदावर वर्णी लागली. विरोधी पक्ष पद नाकारल्यामुळे व मंडल आयोगाबाबत शिवसेनेची भूमिका न पटल्याने भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडून ते काँग्रेसमध्ये गेले.

येवल्यातून चार वेळा आमदार झाले...

१९९५ च्या निवडणुकीत भुजबळांना घरी बसविण्याचा पण शिवसैनिकांनी केला होता. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे तरुण नगरसेवक बाळा नांदगावकरांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत नांदगावकरांचा विजय झाला. भुजबळांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००४ मध्ये येवल्यातून ते विजयी झाले. येवल्यातून ते चार वेळा आमदार झाले आहेत. समीर भुजबळ यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने छगन भुजबळांचे लक्ष पुन्हा माझगाव मतदारसंघाकडे लागले असल्याचे बोलले जाते.

Edited By : Mangesh Mahale

Chhagan Bhujbal
Thackeray Group Vs BJP : ठाकरे गट भाजपाच्या विरोधात गावभर दिंडोरा पिटणार; सांगलीत 'होऊ दे चर्चा' रंगणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com