Gulabrao Patil : होय मी गद्दारी केली; पण... : गुलाबराव पाटलांची जाहीर सभेत कबुली

एक मराठा चेहरा (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता, त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, काय म्हणणं आहे तुमचं?
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

जळगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारखा मराठा चेहरा शिवसेनेतून बाहेर जात होता. त्या शिंदेंना मुख्यमंत्री (Chief Minister) बनविण्यासाठी आम्ही गद्दारी केली, अशी कबुली राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली आहे. (Yes I betrayed; But...: Gulabrao Patil's confession in Sabha)

जळगावमधील एका कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले की आमच्यावर सारखी गद्दार गद्दार म्हणून टीका केली जाते. गुलाबराव पाटील गद्दार झाले, अशी टीका आमच्यावर आमचे विरोधक करतात. पण, गुलाबराव पाटील गद्दार नाही झाले. एक मराठा चेहरा (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता, त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, काय म्हणणं आहे तुमचं?

Gulabrao Patil
Ranjitsingh Vs Ramraje : रामराजेंच्या भाजप प्रवेशाला फडणवीसांकडून नकार : खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा गौप्यस्फोट

आमच्यावर टीका करणाऱ्यांना माझे आव्हान आहे की, तुम्ही कोणत्याही गोष्टीत जातीयवाद करत असाल तर गुलाबराव पाटील यांनी जो त्याग केला तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी केलेला आहे. तुमचा गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसतो, यातच तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार आहे. पण हे लोक आमच्यावर नाहक टीका करतात, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Gulabrao Patil
Solapur DCC Bank : मोहिते पाटील, सोपल, परिचारक, शिंदे बंधूंसह दिग्गजांना डीसीसीत ‘नो एन्ट्री’? चंद्रकांतदादांच्या काळातील ‘त्या’ कायद्याचा अडसर

साखरे हे माझं आवडतं गाव आहे. पंधरा किलोमीटरवरून पाणी आणलं आहे. पण त्यासाठी मी शपथ घेतली होती की, गावात पाणी येईल, तेव्हाच मी साखरे गावात येईन. त्यामुळे मी साखरेत दोन वर्षे गेलो नाही. मी शब्दाचा पक्का माणूस आहे. जे गाव मला कोणत्याही निवडणुकीत ९० टक्के मते देतात, त्या गावाला मी सांगितलं की पाणी देतो. जलवाहिनीला मंजुरी मिळाली; पण त्याचे डीएसआर बदलेले. तेवढ्यात सरकार पडलं. कामाला चार महिने लागले. जे काम १४ महिन्यांत व्हायचे, त्याला दोन वर्षे लागली. आता त्या गावात पाणी आले आहे, त्यामुळे मी लवकरच साखरे गावात जाणार आहे. एवढा शब्द पाळणारा संवदेनशील माणूस आहे मी, असाही एक किस्सा गुलाबरावांनी आपल्या भाषणात सांगितला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com