Rajendra Hagwane Political journey :...तर वैष्णवीला छळणारे सासरे आमदार झाले असते! असा आहे हगवणे कुटुंबाचा राजकीय इतिहास!

Vaishnavi Hagawane Suicide : राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यापूर्वी ते मुळशी तालुक्यातील राजकारणातील मोठे प्रस्थ म्हणून परिचित होते.
Rajendra Hagwane, accused of harassing Vaishnavi, seen during a past political campaign where he was reportedly considered for an MLA ticket.
Rajendra Hagwane, accused of harassing Vaishnavi, seen during a past political campaign where he was reportedly considered for an MLA ticket.Sarkarnama
Published on
Updated on

Rajendra Hagwane News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याचे आलेले राजेंद्र हगवणे आणि त्यांचे मोठा मुलगा सुशील यांना सून वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आज (23 मे) अटक केली. राजेंद्र हगवणे हे मुळशीच्या राजकारणात सक्रीय होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने वैष्णवीच्या आत्महत्येनंतर पक्षावर देखील टीका करण्यात येत होती. मात्र, पक्षाने हा घरगुती प्रकार असल्याचे सांगत राजेंद्र हगवणे यांची हकालपट्टी करून त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी होण्यापूर्वी राजेंद्र हगवणे हे मुळशी तालुक्यात राजकारणातील मोठे प्रस्थ म्हणून परिचित होते. एवढेच नाही तर राष्ट्रवादीकडून त्यांनी 2004 मध्ये स्वतंत्र मुळशी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक देखील लढली होती. मात्र, शिवसेनेचे उमेदवार शरद ढमाले यांनी त्यांचा पराभव केला होता. हगवणे हे 65 हजार 594 मतं मिळवत ते दुसऱ्या स्थानी राहिले होते. शरद ढमाले यांना 78 हजार 701 मते मिळाली होती.

राजेंद्र हगवणे हे आमदराकीला पराभूत झाले होते तरी मुळशीच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मुळशी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले होते. मुळशी तालुक्यात राजाभाऊ म्हणून प्रसिद्ध असणारे राजेंद्र हगवणे मुळशीतील सप्ताह असो की लग्नसमारंभ किंवा अंत्यविधी असो, तिथे अवर्जून उपस्थित राहत. त्यामुळे सामान्यांमध्ये मिसळणारे अशी त्यांची प्रतिमा होती.

Rajendra Hagwane, accused of harassing Vaishnavi, seen during a past political campaign where he was reportedly considered for an MLA ticket.
Gulabrao Patil : पक्षात घेतलेले जळगावचे लोकही तपासा, हगवणे प्रकरणानंतर गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना सल्ला

वडिलांकडून राजकीय वारसा

राजेंद्र हगवणे यांचे वडील तुकाराम हगवणे हे देखील मुळशीच्या राजकारणातील बडे प्रस्थ होते. काँग्रेसमधून शरद पवार यांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. राजेंद्र हगवणे हे कुटुंबवत्सल म्हणून परिचित होते. मात्र, मोठ्या सुनेला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्यांच्या प्रतिमेला तडा गेला.

वैष्णवीच्या आत्महत्येने हळहळ

राजेंद्र हगवणे यांच्या घरात असे काही घडत असेल याची कल्पनाही नसल्याचा सूर मुळशीच्या राजकारणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते तालुक्यामधील बडे नेते असल्याने अनेक कार्यक्रमांना त्यांची हजेरी होती. मात्र, घरामध्ये सुनेचा छळ करत असतील, असे कोणालाही वाटत नसल्याची प्रतिक्रिया खासगीत काही जण देत आहेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हळहळ व्यक्त करत आहेत.

Rajendra Hagwane, accused of harassing Vaishnavi, seen during a past political campaign where he was reportedly considered for an MLA ticket.
Vaishnavi Hagawane Baby: वैष्णवीच्या बाळाची प्रकृती बिघडली; कस्पटे कुटुंबिय रुग्णालयात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com