Vanchit Bahujan Aghadi : 'वंचित'कडून शरद पवारांचे कौतुक, इंडिया आघाडीतील समावेशावर उत्तर मिळेना!

Sharad Pawar News : वंचितला अजून काँग्रेसकडून उत्तराची प्रतीक्षा, कार्यकारणीच्या बैठकीनंतर १२ जागांची मागणी
Sharad Pawar,prakash ambedkar
Sharad Pawar,prakash ambedkarsarkarnama
Published on
Updated on

Vanchit Bahujan Aghadi News : वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीतील समावेशाबाबत अजूनही निर्णय झाला नाही. याविषयी शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना 'वंचित'च्या पत्राला उत्तर देण्याची आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत, इंडिया आघाडीचे निमंत्रण देण्याची विनंती दिल्लीत केली असल्याचे सांगितले होते. त्याविषयी 'वंचित'कडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

१९ डिसेंबरला इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे आम्ही कौतुक करतो. वंचितसाठी त्यांनी दिल्लीत पुढाकार घेतल्याचे आम्हाला मीडियातून समजले, असे 'वंचित'चे मुख्य प्रवक्ता तथा प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.वंचितचे नेते सुजय आंबेडकर यांनी जाहीर सभेतून जर वंचितचा इंडिया आघाडित समावेश झाला नाही आणि काँग्रेसला फटका बसला तर आमच्याकडे रडत येऊ नका, म्हणून सुनावले होते. तसेच वंचितकडून महाविकास आघाडीकडे लोकसभेच्या १२ जागांची मागणी करण्यात आली होती.

Sharad Pawar,prakash ambedkar
Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग ठरला; 'असं' असणार नियोजन

इंडिया आघाडीमध्ये वंचितचा समावेश करण्यात यावा, यासाठी 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहले होते. मात्र, या पत्राला काँग्रेसकडून उत्तर मिळाले नाही. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून आपल्या कार्यकारिणीच्या बैठका आयोजित करून निवडणुकीची तयारी सुरु केल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर, महाविकास आघाडीची नेते आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर लवकरच बैठक घेऊन आघाडीतील समावेशाबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी दिली होती.

वंचितच्या इंडिया आघाडीतील समावेशाबाबत शरद पवार यांना पुण्यातील तसेच अमरावतीमधील कार्यक्रमात विचारण्यात आले होते. त्यावर पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या समावेशाबाबत आपण काँग्रसे अध्यक्ष मल्लिकाअर्जून खर्गे यांच्याशी बोललो आहोत. प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशाबाबत पवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्याचे स्वागत आता वंचितकडून करण्यात आले आहे.

शरद पवारांच्या पुढाकारासाठी कौतुक करताना मात्र, वंचितकडून काँग्रेसबाबत संयमाची भुमिका घेतली आहे. अद्याप आम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिल्लीतील मुख्यालय किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयाकडून कोणतेही पत्र किंवा फोन आलेला नाही. मात्र, आम्ही सकारात्मक आहोत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील समावेशासाठी आमंत्रिक करण्यासाठी काँग्रेसकडून वाट पाहत असल्याचे 'वंचित'कडून सागंण्यात आले.

Sharad Pawar,prakash ambedkar
Sharad Pawar Meet Bachchu Kadu : आमदार बच्चू कडूंच्या 'गोड चहा'चा पाहुणचार शरद पवार यांना भावला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com