Sharad Pawar Meet Bachchu Kadu : आमदार बच्चू कडूंच्या 'गोड चहा'चा पाहुणचार शरद पवार यांना भावला...

Sharad Pawar Meet MLA Bachchu Kadu in Amaravati : "शरद पवार हे देशाचे नेते आहेत. अशा वेळेस शेतीवर काही चर्चा व्हावी हीच आमच्या दोघांची इच्छा होती. "
Sharad Pawar Meet Bachchu Kadu
Sharad Pawar Meet Bachchu Kadu Sarkarnama
Published on
Updated on

Amaravati News : राजकीय संबंधातील कटुता दूर करण्यासाठी प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांच्या गोड चहाचा पाहुणचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गुरुवारी (ता. 28) चांगलाच भावला. अमरावती येथील आपल्या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी आज बच्चू कडू यांची त्यांचे मूळ गाव असलेल्या कुरळपुर्णात येथे जात त्यांची भेट घेतली. (Latest Marathi News)

अमरावती येथून दर्यापूरला जाताना शरद पवार हे सकाळी साडेनऊच्या सुमारासच आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. यावेळी आमदार कडू यांनी शरद पवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शरद पवार येणार असल्याने कुरळपुर्णात त्यांच्या स्वागताचे फलक उभारण्यात आले होते. आमदार बच्चू कडू यांनी आपल्याला चहापाण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या आग्रहामुळे आपण ही भेट घेतल्याची माहिती यावेळी शरद पवार यांनी दिली. भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. बच्चू कडू यांच्या निवासस्थानी त्यांचे कुटुंबीय आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

Sharad Pawar Meet Bachchu Kadu
Amravati : बच्चू कडू-शरद पवारांच्या भेटीनंतर राजकीय संबंधात 'गोडवा'?

बच्चू कडू या भेटीबाबत म्हणाले की, सामाजिक आणि कृषी संदर्भात चर्चा झाली. आमच्या चर्चेत कोणतीही राजकीय मुद्दे नव्हते. आम्ही पवारांना सांगितले की, पेरणी ते कापणीपर्यंतती सगळी कामे 'एमआरईजीएस'मध्ये घेतली गेली पाहिजे. पवारांची राजकीय भेट नव्हती. मदतीची जाणीव म्हणूनच त्यांना निमंत्रण दिले होते. पवारांच्या पुढाकारातून फिनले मिल आली होती. तशाच स्वरूपाची मदत मिळावी, अशी विनंती त्यांना केली. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. अशा वेळेस शेतीवर काही चर्चा व्हावी, हीच आमच्या दोघांची इच्छा होती. राजकीय विषयांवर काही चर्चा झाली असती तर पवार आणि आपण दोघांनीही ते जाहीरपणे सांगितले असते, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले.

आमदार बच्चू कडू यांनी यावेळी शरद पवार यांचा शाल, गुलाबराव महाराज लिखित साधूबोध, अन्य एक ग्रंथ आणि संतांची मूर्ती भेट देत सत्कार केला. पवार यांनी यावेळी आमदार कडू यांच्या परिवारातील सदस्यांशीही संवाद साधला. विधिमंडळासह राजकीय वर्तुळात दिसणारे बच्चू कडू आणि घरातील बच्चू कडू यांच्यात किती फरक आहे, हे पवार यांनी या चर्चेदरम्यान जाणून घेतले. शेती, शेतकरी आणि दिव्यांगांच्या मुद्द्यावर सातत्याने करण्यात येत असलेल्या त्यांच्या आंदोलनामुळे किती परिवर्तन झाले याची चर्चा पवारांनी कडू कुटुंबीयांसोबत केली. आमदार बच्चू कडू यांना घरातून व गावातून मिळणाऱ्या पाठिंब्याचेही त्यांनी कौतुक केले.

Sharad Pawar Meet Bachchu Kadu
NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादीचा अजित पवार गट टाकणार 'टाॅप गिअर' ; जिल्हाध्यक्षांना मिळणार 'हे' मोठं गिफ्ट

महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाचा दर्जा असलेले आमदार बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. मंत्रीपद न मिळाल्याने त्यांची नाराजी असल्याचे सांगण्यात येते. राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा ही त्यांनी शेतकरी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला घरचा अहेर दिला होता. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आमदार बच्चू कडू यांची घेतलेली भेट राष्ट्रीय वर्तुळातील नव्या चर्चेला कारण ठरली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com