शरद पवारांनी दावा केला की विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोकांनी मतांची फेरफार करून 160 जागा जिंकण्याची ऑफर दिली होती.
राहुल गांधींच्या मतदान चोरीच्या आरोपांनंतर पवारांच्या वक्तव्यामुळे वादाला नवा रंग मिळाला.
वंचित बहुजन आघाडीने पवारांवर अर्धसत्य सांगितल्याचा आरोप केला.
Mumbai News : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आगाडीला यश मिळाले होते. पण विधानसभेला मविआला यात सतत्य राखता आले नाही. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. महायुतीचे राज्यात तब्बल 232 उमेदवार विजयी झाले. पण मविआला 50 च्या पुढेही जागा मिळाल्या नाहीत. यानंतरच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदान चोरीचा आरोप भाजपवर सातत्याने केला आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोक माझ्याकडे आले होते, जे मतांची फेरफार करून 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, असे सांगितले. यानंतर एकच खळबळ उडाली असून शरद पवार यांच्या गौप्यस्फोटावर वंचित बहुजन आघाडीने देताना काही प्रश्न विचारले आहेत. तसेच शरद पवारांनी पुन्हा अर्धसत्य सांगितलं, अशी टीका केली आहे. ("Sharad Pawar reveals two people offered to manipulate votes and secure 160 assembly seats before elections, intensifying Rahul Gandhi’s allegations against BJP")
शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी काय घडलं याचे स्पष्टीकरण देताना, ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोकांनी त्यांच्याशी संपर्क केला होता. ते त्यांना भेटले होते. तर 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्यासाठी मतांची फेरफार करू असे सांगत होते. पण मला ते पटले नाही. यामुळे तो विषय तेथेच सोडून दिला, असा दावा केला होता. त्यांच्या दाव्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापलं होतं. यावरूनच आता वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत शरद पवार यांच्याना 5 एक प्रश्न विचारले आहेत.
वंचित बहुजन आघाडीने, शरद पवार पुन्हा एकदा अर्धसत्य सांगून निघून गेले आहेत. त्यांनी स्पष्टीकरण सांगताना या घडलं ते सांगितलं. पण त्यांनी या प्रश्नांना बगल दिली....
1. जी दोन लोकं आली होती. ज्यांनी ही योजना आखली आणि त्यांना सांगितली. याची तक्रार शरद पवार यांनी पोलिस किंवा निवडणूक आयोगाकडे का केली नाही? मात्र हा प्लॅन काय आहे हे सांगण्यासाठी त्यांना घेवून राहुल गांधींकडे गेलात
2. जर त्या दोघांची नावं आणि पत्ता माहीत नसेल, तर त्यांचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या घरात प्रवेश कसा झाला.
3. प्लॅन ऐकल्यानंतर त्यांना राहुल गांधींकडे घेऊन जाणे, म्हणजे तुमचा हेतू चांगला नव्हता. तुम्हाला, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी होऊ शकते हे माहित होते. जर याची माहिती होतील तर मग कोणाच्या सांगण्यावरून आतापर्यंत तुम्ही गप्प होता.
4. राहुल गांधींनी तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्याचे पुराव्यानिशी स्पष्टीकरण द्यावे
5. शरद पवार यांनी ज्या पद्धतीने या गोष्टी समोर आणल्या, त्या पद्धतीने त्यांच्याशी राहुल गांधी सहमत आहेत का? असे सवाल केले आहेत.
प्र.१: शरद पवारांनी काय दावा केला?
उ: दोन लोकांनी मतांची फेरफार करून 160 जागा जिंकण्याची हमी दिल्याचा दावा केला.
प्र.२: हा वाद का वाढला?
उ: राहुल गांधींच्या मतदान चोरीच्या आरोपांनंतर पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद तीव्र झाला.
प्र.३: वंचित बहुजन आघाडीची प्रतिक्रिया काय होती?
उ: पवारांनी पुन्हा अर्धसत्य सांगितल्याचा आरोप केला आणि थेट प्रश्न विचारले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.