Sharad Pawar: राजकीय कुटनीती अपयशी ठरलेली नाही पण ट्रम्पवर...; अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले

Sharad Pawar: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच भारतावर पन्नास टक्के टॅरिफची घोषणा केली. ट्रम्प यांच्या या मुजोर व्यवहारावर भारतातील विविध राजकीय, आर्थिक संघटनांनी आणि व्यक्तींनी टीका केली आहे.
Donald Trump_Sharad Pawar
Donald Trump_Sharad Pawar
Published on
Updated on

Sharad Pawar spoke on Donald Trump Tariff issue: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच भारतावर पन्नास टक्के टॅरिफची घोषणा केली. ट्रम्प यांच्या या मुजोर व्यवहारावर भारतातील विविध राजकीय, आर्थिक संघटनांनी आणि व्यक्तींनी टीका केली आहे. त्यातच हे मोदी सरकारचं परराष्ट्र धोरणातील अपयश असल्याचंही काही विरोधकांनी म्हटलं आहे. पण यासर्व चर्चांमध्ये देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र थोडी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्यांदाच पवार हे या टॅरिफ प्रकरणावर बोलले आहेत.

लक्ष देऊ नका

नागपूर इथं मंडल यात्रेदरम्यान शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमेरिकेनं भारतावर लादलेल्या ५० टक्के कर प्रणालीवर (टॅरिफ) भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, "हा अमेरिकेकडून आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. मला आज असं म्हणायचं नाही की यामध्ये राजनैतिक कूटनीति अपयशी ठरली आहे. कारण ट्रम्पवर कोणाचंही नियंत्रण नाही, जे मनात येईल ते ट्रम्प करतात, त्यामुळं अशा माणसाकडं जास्त लक्ष देऊ नये"

Donald Trump_Sharad Pawar
NCP News : धाराशीव राष्ट्रवादीची धुरा कोणाच्या खांद्यावर ? अजित पवार भाकरी फिरवणार? की जुनाच चेहरा देणार..

160 जागा जिंकण्याची ऑफर

दरम्यान, शरद पवारांनी राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनविरोधात सुरु केलेल्या मतचोरीच्या कॅम्पेनवरही भाष्य केलं. पवार म्हणाले, "विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दिल्लीत मला दोन लोक भेटायला आले होते. त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ पैकी १६० जागा जिंकून देऊ शकतो अशी ऑफर मला दिला होती. निवडणुकीच्या काळात असे अनेक लोक भेटत असतात, त्यामुळं आम्ही त्याकडं दुर्लक्ष केलं. लोकांच्या मनात जी इच्छा आहे त्याला सामोरे जाऊ असं ठरवले होतं. कारण आमचा त्यावेळी निवडणूक आयोगावर विश्वास होता. पण आता जे काही घडत आहे, समोर येत आहेत त्यावरून निवडणूक आयोगाच्या पारदर्शक कारभाराविषयी शंका असल्याचं पवार म्हणाले.

Donald Trump_Sharad Pawar
ऑगस्ट क्रांती! 83 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच गांधीजींच्या नेतृत्वात लाखो भारतीयांनी ब्रिटिशांना देश सोडण्याचं दिलं होतं आव्हान

सोमवारी आंदोलनाचा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार याद्यांमध्ये काही घोळ असू शकतो मात्र त्याला चोरी म्हणणे यावर आक्षेप घेतला आहे. यावर पवार म्हणाले, आमचा जो काही आक्षेप आहे तो निवडणूक आयोगावर असल्याचं सांगून अप्रत्यक्षपणे यावर भाजपनं खुलासा करण्याची गरज नाही अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांना सुनावलं. तसंच आमची माहिती चुकीची असेल तर आयोगानं तसं स्पष्ट करावं. येत्या सोमवारी याचा जाब आम्ही आयोगाला विचारणा आहोत. निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचाही निर्णय आम्ही सर्व विरोधकांनी घेतला असल्याचे पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com