VBA–Congress Alliance : काँग्रेस-वंचितची अधिकृत युती जाहीर, 'या' नगरपालिकांमध्ये दाखवणार ताकद; जागा वाटपाचा फाॅर्म्युला निश्चित

Buldhana Local body Election : नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी वंचित आणि काँग्रेसमध्ये अधिकृत युतीची करण्यात आली आहे.
rahul gandhi Prakash ambedkar
rahul gandhi Prakash ambedkarsarkarnama
Published on
Updated on

Buldhana Politics : विधानसभा आणि लोकसभेत वंचित आणि काँग्रेसमध्ये युतीची चर्चा सुरू होती. मात्र, ऐनवेळी वंचितने माघार घेत स्वबळाचा नारा दिला. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत वंचित, काँग्रेस एकत्र लढणार असल्याची चर्चा होती. ती खरी ठरली आहे. वंचित आणि काँग्रेसच्या अधिकृत युतीची घोषणा करण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात वंचित-बहुजन आघाडी एकत्र लढणार असून दोन्ही पक्षांमध्ये ५०-५० टक्के जागावाटप निश्चित झाले असून, या आधारे नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

बुलढाणा, सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि लोणार तसेच खामगाव, शेगाव आणि जळगाव जामोद या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुका वंचित-काँग्रेस युतीमध्ये लढवणार आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी वंचितसोबत स्थानिक पातळीवर युती करणार असल्याचे सांगितले होते. स्थानिक गणितं लक्षात घेत वंचित, बसपासोबत जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. अखेर बुलढाण्यामध्ये वंचित आणि काँग्रेस अधिकृतरित्या एकत्र आले आहेत.

rahul gandhi Prakash ambedkar
Ajit Pawar : अजितदादांना धक्का; प्रदीप गारटकरांचे बंड; हर्षवर्धन पाटलांनी दिली साथ; इंदापूरच्या राजकारणात ट्विस्ट; नगराध्यक्षपदावर दावा!

वंचितचे बुलढाणा जिल्हा प्रभारी प्रदीप वानखेडे म्हणाले, वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व उमेदवार, संघटनात्मक तयारी, प्रचार आराखडा आणि कार्यकर्त्यांचे नियोजन पूर्ण केले आहे. या युतीमुळे जिल्ह्यात मजबूत पर्याय उभा राहील आणि दोन्ही पक्षांना चांगले यश मिळेल.

rahul gandhi Prakash ambedkar
Kalyan Politics : एकनाथ शिंदेंना भाजपचा मोठा झटका, बालेकिल्ल्यातील शिलेदार फोडले, माजी नगरसेविका, सहसंपर्कप्रमुखांनी हाती घेतले 'कमळ'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com