KDMC Election : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपने सुरुंग लावला आहे. कल्याण महापालिकेत स्वबळावर सत्ता आणण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू केले आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे शिंदेंच्या शिवसेनेनाल मोठा फटका बसत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, कल्याण पूर्वमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी, सहसंपर्कप्रमुख विजय जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेची पूर्वे कल्याणमध्ये असलेली पकड ढासळल्याची चर्चा आहे. चव्हाण म्हणाले, 'कल्याण पूर्वेतील नागरी समस्यांचे निराकरण आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी ही फळी भाजपला निश्चितपणे बळ देणारी आहे. आपण दिलेला शब्द पाळतो आणि आपली कार्यपद्धती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.'
मंढारी यांचा स्थानिक नागरिक, संस्था व कार्यकर्त्यांमध्ये दांडगा संपर्क असल्याने आगामी पालिका निवडणुकीसाठी त्यांचा भाजप प्रवेश हा महत्त्वाचा मानला जात आहे. प्रभागातील संस्था, संघटना आणि नागरिकांशी त्यांचा असलेला सशक्त संपर्क हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मानली जात होती. मात्र, मंढारी हे भाजपमध्ये गेल्याने शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे यांचे पुत्र केतन रोकडे, संध्या रोकडे आणि स्नेहल रोकडे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. रोकडे कुटुंब भाजपमध्ये आणण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. भाजपमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे कल्याण डोंबिवलीचा महापौर हा भाजपचाच होणार असा आत्मविश्वास पदाधिकारी बोलून दाखवत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.