AAP political strategy : आम आदमी पार्टीचा ‘आघाडीभंग'; जाहीर केला महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा

Aam Aadmi Party News : 'आप'ने आगामी महापालिका जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. सोबतच नागपूर महापालिका निवडणुकीचा जाहीरनामासुद्धा प्रकाशित केला.
AAP
AAPSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीला विनाशर्त पाठिंबा देणाऱ्या आम आदमी पार्टीचा आता आघाडीभंग झाला आहे. आघाडीतील पक्ष कोणीच कोणाला मदत करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर 'आप'ने आगामी महापालिका जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. सोबतच नागपूर महापालिका निवडणुकीचा जाहीरनामासुद्धा प्रकाशित केला.

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास महाराष्ट्र प्रभारी व दिल्लीचे माजी आमदार प्रकाश जरवाल, महाराष्ट प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील व महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव भूषण ढाकूलकार, प्रदेश सचिव डॉ. शहीद अली जाफरी, प्रदेश सचिव सुनील वदसकर व नागपूर शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला परीभूत करण्यासाठी आम आदमी पार्टीने (AAP) बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता.

AAP
Sanjay Jagtap Join BJP : काँग्रेसला खिंडार; संजय जगतापांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला! पश्चिम महाराष्ट्रात 'मिशन लोटस'

एवढेच नव्हे तर विनामोबदला आघाडीच्या उमेदवाराचा प्रचारही कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत आपच्या कार्यकर्त्यांना कोणी विचारले नाही. आघाडीत असलेल्या पक्षांच्या नावांमध्ये आपच समावेशसुद्धा केला जात नव्हता. हे बघून आता आपने यापुढे कुठल्याच पक्षासोबत आघाडी किंवा युती करायची नाही असे जाहीर केले आहे.

AAP
Murlidhar mohol Experience: फडणवीस मवाळ तर मोदी-शहा कडक हेडमास्तर; मुरलीअण्णांना आला चांगलाच अनुभव

महापालिकेच्या निवडणुकीत आपने आता दिल्ली पॅटर्न प्रमाणे काम करायचे ठरवले आहे. 50 टक्के उमेदवार वयाच्या पस्तीशीतल्या आतचे राहणार आहे. त्या सर्वांना आधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात महिलांची संख्याही राहणार आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arviand Kejrival) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वात दिल्ली व पंजाबमध्ये यशस्वी ठरलेले जनहिताचे मॉडेल आता नागपूरमध्ये राबवण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.

AAP
Devendar Fadnavis : चंद्रकांत पाटलांच्या चुकीच्या शब्दाऐवजी, आशय समजून घ्यायला हवा, हल्ला दुर्दैवी!

आपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनामान्यात या जनहिताच्या मुद्यांचा समावेश केला आहे. मनपाच्या 114 शाळांना उच्च दर्जाचे शिक्षक व 50 आधुनिक तंत्रज्ञानयुक्त करणार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, फुले, भगतसिंग, आझाद यांचे स्मारक, शिक्षण संकुल उभारणार, प्रत्येक घरात दररोज 20 हजार लिटर मोफत नळपाणी, सर्वच प्रभागांमध्ये मोफत टेस्ट व उपचाराची मोहल्ला क्लिनिकच्या रूपाने आरोग्य केंद्रे उभारणार, घाणीच्या नाल्यांचे भूमिगत नाले व गटारांचे पुनर्रचना गटारांची व्यवस्था करण्यात येईल, झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे देणार, महिलांसाठी मोफत बस प्रवास व उद्योजिकांसाठी व्याजमुक्त कर्ज योजना, विद्यार्थी सन्मान योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सावलतीच्या दरावर पास, फेरीवाल्यांसाठी सुसज्ज रस्ता व संरक्षित जागा, विद्यार्थ्यांना मोफत वाय-फाय झोन देण्याचा वादा आम आदमी पार्टीने केला आहे.

AAP
Shivsena UBT Vs BJP : उद्धव ठाकरेंनी कधीतरी खरं बोलावं; चंद्रशेखर बावनकुळेंनी असं का म्हटले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com