Murlidhar mohol Experience: फडणवीस मवाळ तर मोदी-शहा कडक हेडमास्तर; मुरलीअण्णांना आला चांगलाच अनुभव

BJP leadership style News : येथील हेडमास्तर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मावळ आणि सौम्य होते. थोडी काही चूक झाली आणि ती दुरुस्ती केल्यानंतर सर्व काही ठीक व्हायचे, मात्र केंद्रामध्ये वेगळी परिस्थिती आहे.
devendra fadnavis, murlidhar mohol, amit shah, narendra modi
devendra fadnavis, murlidhar mohol, amit shah, narendra modi Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपमध्ये कार्यकर्ते, नगरसेवक, महापौर आणि त्यानंतर थेट खासदार होऊन केंद्रीय मंत्री झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्री पदाची वर्षपूर्ती झाली आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रातील नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबतचे काही किस्से सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मऊ हेडमास्तर असून मोदी शहा हे कडक हेडमास्तर असल्याचे सांगितले.

खासदार मुरलीधर मोहोळ (Murliadhar Mohol) यांनी आपल्या मंत्रिपदाच्या एक वर्षाचा कार्य अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित केला. यावेळी बोलताना मुरलीधर मोहळ म्हणाले, केंद्रीय मंत्री म्हणून काम करताना खूप काही अनुभव येतात. केंद्रीय मंत्री गाड्या-घोड्या दिसताना ते सर्व फार छान दिसत असले तरी केंद्रामधील हेडमास्तर हे फार कडक असून त्यांचा सामना करावा लागतो. येथील हेडमास्तर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मावळ आणि सौम्य होते. थोडी काही चूक झाली आणि ती दुरुस्ती केल्यानंतर सर्व काही ठीक व्हायचे, मात्र केंद्रामध्ये वेगळी परिस्थिती आहे.

devendra fadnavis, murlidhar mohol, amit shah, narendra modi
Devendra fadnavis : पहिल्याच टर्मला मंत्रि‍पदाची लॉटरी; पण वर्षभरातच मिळवली अमित शहांची शाबासकी: फडणवीसांकडून मोहोळांचं तोंडभरून कौतुक

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा-सात दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यमंत्र्यांना अनौपचारिकपणे गप्पा मारण्यासाठी आणि चहापाण्यासाठी बोलावलं होतं. त्याच दिवशी सकाळी दिल्ली विमानतळावर एक छत कोसळला होता. सायंकाळी झालेल्या बैठकीदरम्यान पंतप्रधान प्रत्येकाच्या खात्याबाबत माहिती घेऊन अनौपचारिक गप्पा मारत होते. त्यावेळी मी त्यांना माझे खाते आणि माझा परिचय दिला. त्यावेळी त्यांनी लगेचच विचारलं की आज दिवसभर काय केले.

devendra fadnavis, murlidhar mohol, amit shah, narendra modi
Sanjay Jagtap Join BJP : काँग्रेसला खिंडार; संजय जगतापांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला! पश्चिम महाराष्ट्रात 'मिशन लोटस'

कदाचित त्यांना दिल्ली विमानतळावर झालेल्या अपघाताबाबत मला माहिती आहे का ? नाही हे जाणून घ्यायचे असेल मात्र मी त्या दिवशी त्या अपघात ठिकाणी देखील गेलो होतो आणि त्यापूर्वी जखमींची हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी देखील केली होती. त्याबाबत मी पंतप्रधानांना कल्पना दिली. माझे सर्व काही ऐकून घेतल्यानंतर मोदीजींनी मला सांगितलं की तुम्हाला माहित आहे का? तुम्ही घटनास्थळावर अडीच तास उशिरा पोहचला होतात. अशा पद्धतीने पहिल्याच भेटीत आपला समाचार झाल्याने कुठून येथे आलो, अशी भावना आपल्या मनात आल्याचे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

devendra fadnavis, murlidhar mohol, amit shah, narendra modi
Shivsena UBT Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेंचा सुरुंग! भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात 'दे धक्का', काँग्रेस,राष्ट्रवादीतूनही इन्कमिंग!

त्यानंतर आणखी एक किस्सा सांगताना मोहोळ म्हणाले, 'हरियाणातील एका विमानतळाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्या शेजारी बसण्याचा योग आला. तेव्हा कार्यक्रमादरम्यान मोदीजी यांनी माझ्याशी संवाद साधला आणि म्हणाले, दहा-बारा महिने झाले तुम्हाला मंत्री होऊन एकदा येऊन जा आणि काय केले? काय नाही ? याबाबत सांगा म्हणत भेटण्याचे आदेश दिले. त्यामुळे केंद्रीय मंत्रीपद वगैरे सगळ्यांना सगळं भारी वाटत असले तरी मंत्रीपद आल्यानंतर फार संघर्ष करावा लागतो, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

devendra fadnavis, murlidhar mohol, amit shah, narendra modi
Jayant Patil: तीन निवडणुकांमध्ये पराभव ते पक्षाची फूट : जयंत पाटलांच्या कारकि‍र्दीतच राष्ट्रवादीने गमावला 'राष्ट्रीय' पक्षाचा दर्जा

अमित शहा यांच्या सोबतचा किस्सा

विश्वविद्यालयाचे एक बिल लोकसभेत अमित शहा यांनी मांडले. त्यानंतर अमित शहा यांनी मला बोलून घेतले आणि सांगितले राज्यसभेत तुला बिल मांडायचे आहे. तेव्हा माझा पोटातच गोळा आला. मनातल्या मनात म्हणालो, माझा कार्यक्रम सुरू झाला आहे, त्याआधीच संपायचा. मला काही सुधरेना. पुन्हा अमित शहा म्हणाले, मी सुद्धा राज्यसभेत असणार आहे. मी अमित शहा यांना म्हणालो तुम्ही राज्यसभेत असाल तर अजून टेन्शन येईल. अमित शहा म्हणाले टेन्शन कशाला घेतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलायचे झाल्यावर काय करणार? जा थोडा अभ्यास कर.. नंतर बाहेर पडताना म्हणाले थोडा हिंदीचा अभ्यास कर. त्यामुळे दिसते तसे नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं म्हणून मी केंद्रात गेलो अशा भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.

devendra fadnavis, murlidhar mohol, amit shah, narendra modi
Shivsena UBT Vs BJP : उद्धव ठाकरेंनी कधीतरी खरं बोलावं; चंद्रशेखर बावनकुळेंनी असं का म्हटले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com