Nagpur : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करणार देशभरातील कॉलेजेसमध्ये ‘ब्रेन वॉशिंग’

ABVP : डाव्या आणि राष्ट्रविघातक विचारसारणीच्या विरोधात देणार लढा; शिक्षणाप्रती जनजागृतीही
ABVP In Colleges.
ABVP In Colleges.Google
Published on
Updated on

College Politics : देशातील राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून तरुणाईची मोठी भूमिका राहिली आहे. 2014 पासून नरेंद्र मोदी आणि भाजप सातत्याने तरुणाईवर लक्ष देत आहेत. भाजपला यासंदर्भात मिळालेल्या यशानंतर देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी आता तरुणाईवर लक्ष केंद्रीत केले आहे. 18 ते 35 वयोगटातील ही तरुणाई देशाच्या राजकारणात निर्णायक ठरत आहे. त्यामुळे आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही देशभरातील कॉलेजेसमध्ये जात युवा वर्गाचे ‘ब्रेन वॉशिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील अनेक कॉलेजेमध्ये डाव्या विचारसणीचा प्रभाव आहे. काही विद्यापीठांमध्ये इतर धर्मातील राजकीय पक्ष व संघटनांचा जोर आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होत आहे. त्यातूनच ‘भारत तेरे तुकडे होंगे..’ अशी घोषणाबाजी करण्यापर्यंतची प्रकरणे गेली आहे. ही बाब लक्षात घेता डावी व देशविघात विचारसरणी कायमची नष्ट करण्याठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आता देशव्यापी मोहिम राबविणार आहे.

ABVP In Colleges.
Nagpur : राज्य सरकारला ‘चुल्लुभर’ पाण्यात बुडून मरायची वेळ.. कोण म्हणालं असं...

देशात आणि देशातील शैक्षणिक परिसरात नकारात्मकतेचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. हे वातावरण देशातील एकसंघता तोडण्यासाठी करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी अनास्था निर्माण झाली आहे. सरकार व न्याय व्यवस्थेबद्दल तरुणाईच्या मनात चीड निर्माण करण्यात येत आहे. त्यांना चिथावणी देण्यासाठी प्रक्षोभक विधानेही केली जात आहेत. परिणामी, महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावत आहे. याशिवाय ही मंडळी चुकीच्या संघटनांच्या संपर्कात येत आहे

यासंदर्भातील अनेक पुराव देत महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या शैक्षणिक परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी शुक्रवार, 12 जानेवारीपासून देशभर ‘चलो कॅम्पस’ अभियान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून राबविले जाईल, अशी माहिती नागपूर येथे देण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटक प्रफुल्ल आकांत यांनी बोलताना सांगितले की, मागील 75 वर्षांपासून शैक्षणिक वर्तुळात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदत करीत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे देशातील तरुणाईमध्ये सकारात्मक निर्माण करण्याचे काम करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत 12 जानेवारीपासून देशभरात ‘चलो कॅम्पस’ अभियान राबविले जाणार आहे.

या अभियानात महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती हा चिंतेचा विषय आहे. महाविद्यालय हे ऊर्जा निर्माण करणारे केंद्र व्हावे, संस्कार देणारे केंद्र व्हावे, विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे ओढा वाढून त्यांची उपस्थिती वाढावी, हा या अभियानमागचा उद्देश आहे. यासाठी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, महाविद्यालय प्रशासन या सर्व घटकांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे.

ABVP In Colleges.
Revanth Reddy : ABVP ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष; तेलंगणात रेवंथ रेड्डी ठरले 'किंगमेकर!'

केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण आणले आहे. या धोरणाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन होईल. भारतीय भाषांमध्ये आता डॉक्टर, अभियंता, वकील होता येईल. शिक्षणपद्धती भारतीय भाषेत उपलब्ध झाली आहे. त्यातून विद्यार्थ्यांचा शिक्षणात सहभाग वाढेल, असा विश्वासही आकांत यांनी व्यक्त केला.

Edited by : Prasannaa Jakate

ABVP In Colleges.
Documentary on Modi : मोदींवरील डॉक्युमेंट्रीला ABVP चे सडेतोड उत्तर ; 'द काश्मीर फाइल्स'..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com