50 हजारांची लाच मागणारा BDO अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

मोहदी येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (PMAY) घरकुलाचा मोठा घोटाळा करण्यात आला आहे.
Yevtmal BDO
Yevtmal BDO Sarkarnama
Published on: 
Updated on: 

पुणे : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पंचायत समिती (Mahagaon Panchayat Samiti) अंतर्गत येणाऱ्या मोहदी येथील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात कारवाई मॅनेज करण्यासाठी 50 हजारांची लाच मागण्यात आली. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने सापळा रचून कारवाई केली आहे. यामध्ये महागाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी (BDO Officer) गजानन एस. गौतम आणि त्यांच्या वतीने 50 हजाराची लाच स्विकारणाऱ्या अनंता नागरगोजे या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.

Yevtmal BDO
बारामतीत निघाला एसटी संपावर तोडगा

याप्रकरणी अनंता नागरगोजे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली असून प्रभारी गटविकास अधिकारी गजानन गौतम यांचा शोध घेण्यात येत आहे. मोहदी येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा मोठा घोटाळा करण्यात आला आहे. या घोटाळ्यात जुन्या घरांची डागडुजी करून शासकीय अनुदान हडप करण्यात आले. याप्रकरणी चौकशी समितीने ग्रामसेवक आणि दोन अभियंत्यांवर ठपका ठेवून सव्वाचार लाख रुपये वसूलपात्र ठरवण्यात आले होते. या प्रकरणात मोहदीच्या सरपंचाचे अहवालात नाव गोवून आरोपी करण्याचे कट रचले गेले होते.

Yevtmal BDO
ओमिक्रॉननं गाठली राजधानी; टांझानियाहून आलेल्या प्रवाशाला लागण

या कारवाईतून त्यांचे नाव वगळण्यासाठी 50 हजार रुपयाची मागणी करण्यात आली होती. हे पैसे मध्यस्थ अनंता नागरगोजे यांच्याकडे पैसे देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मोहदीचे सरपंच व त्यांच्या भावाने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून एसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Ravi rana, Navneet Rana, balvant wankhde
Kanhalgaon Sanctuary | Sudhir Mungantiwar
Shalarth ID Scam
navneet rana, pravin pote patil