सत्तास्थापनेपूर्वीच्या हालचालींना वेग; भाजप आमदार विमान, रेल्वेने मुंबईला निघणार...

आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) सायंकाळी मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे.
Uddhav Thackeray, Sudhir Mungantiwar and Eknath Shinde
Uddhav Thackeray, Sudhir Mungantiwar and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे बंड आता निर्णायक वळणावर आल्याचे दिसते आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू उद्या गुवाहाटीवरून काही अपक्ष आमदारांसोबत मुंबईला पोहोचणार असल्याची माहिती आहे. तर येथे विदर्भातील भाजपच्या सर्व आमदारांना उद्या दुपारपर्यंत मुंबईत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी आज नागपुरात (Nagpur) भाजपच्या (BJP) नेत्यांची बैठक घेतली. ही बैठक संघटनात्मक असल्याचे सांगण्यात आले होते. पण इतक्या तातडीने ही बैठक कशासाठी घेण्यात आली, हे सहज समजता येण्याजोगे आहे. याच बैठकीत त्यांना मुंबईत (Mumbai) पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्या सकाळी ८.३० वाजता अमावस्येचा प्रभाव संपल्यानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडी कोणतेही वळण घेऊ शकतात. त्यामुळे भाजपने ही तयारी चालवल्याची माहिती आहे. आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार सायंकाळी मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संकटात आलेले महाविकास आघाडी सरकार पडण्याचीच शक्यता बघता भाजपने राज्यातील सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. पूर्व विदर्भातील आमदार विमानाने तर पश्चिम विदर्भातील आमदार रेल्वेने मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती सूत्राने दिली. सर्वच आमदारांना उद्या दुपारपर्यंत मुंबईत पोहोचण्याच्या सूचना भाजपच्या वरिष्ठांनी दिल्या असल्याचे समजते.

Uddhav Thackeray, Sudhir Mungantiwar and Eknath Shinde
उद्धव ठाकरेंच्या भोवतीचे बडवे कोण; बंडखोरांचा या नेत्यांवर निशाणा

विदर्भातील आमदार, खासदार, महामंत्री आदी पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आज लक्ष्मीनगरातील एका हॉटेलमध्ये पार पडली. ही तातडीची बैठक माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलावली होती. राज्यात निर्माण झालेल्या स्थितीवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्राने नमूद केले. परंतु प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही बैठक संघटनात्मक असल्याचे सांगितले. राज्यातील सत्ताकारणात कधीही सरकार स्थापनेची वेळ आल्यास सर्व आमदार एकाच ठिकाणी असावे, या हेतूने सर्व आमदारांना उद्या दुपारपर्यंत मुंबईत बोलावले आहे.

मुंबईत झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विदर्भात भाजपचे २९ विधानसभा आणि ६ विधान परिषदेचे आमदार आहेत. यात पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती येथील आमदारांना नागपूरला येऊन मुंबईला जाणे उलटे पडत असल्याने त्यांनी बैठकीला न येता परस्पर रेल्वेने जाण्याची परवानगी मागितली. त्यांना रेल्वेने जाण्याची परवानगी देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com