Aditya Thackeray : आदित्य ठाकरे ३ वाजता पोहोचणार नांदगाव राख बंधाऱ्यावर...

आदित्य ठाकरे (Aditya Thakeray) शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत नांदगाव बंधाऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक कापसे यांच्या तान्हा पोळ्याला भेट देतील.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

नागपूर : कोराडी पॉवर प्लांटचा राखेचा तलाव फुटून गेल्या महिन्यात हाहाकार उडाला होता. त्यामध्ये शेकडो हेक्टर शेतांचे नुकसान झाले होते. दरम्यान पारशिवणी तालुक्यातील नांदगाव राखेच्या बंधाऱ्यातून शेतांमध्ये पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या.

शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakeray) यांचे आज दुपारी २ वाजता नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) आगमन होणार आहे. येथून ते थेट पारशिवनी तालुक्यातील नांदगाव येथील राख बंधाऱ्यावर जाणार आहेत. अलीकडेच खसाळा येथील राख बंधारा फुटल्याने यावरून आता शिवसेना आणि भाजपात (BJP) जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नांदगाव राख बंधाऱ्याचे पाणी शेतामध्ये सोडल्या जात असल्याच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे शेती खराब होत असल्याची तक्रार तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी याची लगेच गंभीर दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले होते.

महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात एक अहवाल सादर केला होता. त्याची शहानिशा करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना बंधाऱ्यावर पाठवले होते. त्यानंतर महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना तंबी देऊन यापुढे राख नदीत सोडायची नाही, असेही बजावले होते. राज्यातील सत्तांतराणानंतर कोराडी तालुक्यातील खसाळा राख बंधारा फुटला. शेकडो एकर शेती यामुळे खराब झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी केली. महानिर्मितीने दोन अभियंत्यांना निलंबित केले आहे.

Aditya Thackeray
Monsoon Session : त्यांची मला कीव येतेय ; आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना प्रत्युत्तर

राख बंधाऱ्याची उंची वाढवण्याचे कंत्राट चार वर्षांपूर्वी जिल्ह्यातील एका कंत्राटदाराला दिले होते. त्याकरिता तब्बल ६६ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. कोट्‍यवधी रुपये खर्च केल्यानंतरही चारच वर्षांत राख बंधारा फुटला. मात्र, कंत्राटदारावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संबंधित कंत्राटदाराला साधी नोटीसही महानिर्मितीने धाडली नाही. दोन अभियंत्यांना निलंबित करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे उद्या काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे त्यांचा दौरा खास यासाठी आयोजित करण्यात आला आहे.

तान्हा पोळ्याला राहणार उपस्थित..

आदित्य ठाकरे दुपारी दोन वाजता मुंबईवरून नागपूर विमानतळावर दाखल होणार आहेत. येथूनच ते शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत नांदगाव बंधाऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक कापसे यांच्या तान्हा पोळ्याला भेट देतील. पावणे सातच्या विमानाने आदित्य ठाकरे मुंबईला रवाना होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com