Monsoon Session : त्यांची मला कीव येतेय ; आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना प्रत्युत्तर

aditya thackeray : बंडखोरांनी जी काही निदर्शने झाली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसले," असे ठाकरे यांनी सांगितले.
aditya thackeray
aditya thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray)यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला. ठाकरेंच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

"शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्या मनात भीती दिसली. गद्दारी या महाराष्ट्राला पटलेली नाही. जनतेचा कुठेही त्यांना पाठिंबा नाही. एका चांगल्या, प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून ते गेलेत. त्यामुळेच त्यांना पायऱ्यांवर अशी घोषणाबाजी करावी लागत आहे," असे आदित्य म्हणाले.

आज ज्यांना पायऱ्यांवर उभे केले होते त्यांची मला कीव येत आहे. त्यांना मंत्रिपदासाठी माझ्याविरोधात बोलावं लागतय. बंडखोरांनी जी काही निदर्शने झाली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसले," असे ठाकरे यांनी सांगितले.

aditya thackeray
AAP चे ४० आमदार 'गायब' ; केजरीवाल यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी, ऑपरेशन लोटस?

आदित्य ठाकरे म्हणाले..

  • शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, शिक्षणाचे प्रश्न सोडवणे तसेच राज्याच्या कल्याणाचा विचार करणे हे आमचे हिंदुत्व आहे. आता जे सुरू आहे ते रावण राज्य आहे. राम राज्य नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन चालने हे आमचे हिंदुत्ववादी धोरण आहे.

  • आमच्यावर अशा कितीही टीका केल्या तरी आम्ही फिरत राहू. आमचे दौरे सुरु राहतील. आमचा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न झाला तरी शिवसेना उभी राहिल. पर्यटन खाते घेऊन जगाची वारी करायची नसते. आपण पर्यटक नसतो.

  • आज ते टीका करत आहेत पण मला त्यांना विचारायचय की आम्ही तुम्हाला काय कमी केलं? आणि काय कमी दिलं. अशी काही खाती जी कधीही कुठल्या मुख्यमंत्र्याने सोडलेली नव्हती. ती खाती यांना दिली. तरी यांनी गद्दारी केली. आज त्यांच खर रुप दिसत आहे.

  • महिला, शेतकरी,तरुणांचे जे प्रश्न आहेत ते घेऊन जर हे लोक पायऱ्यावर उभे राहिले असते तर मला त्यांचे कौतुक वाटले असते. दहीहंडी मंडळांसाठी जीआर काढू अशी घोषणा केली. मात्र यासंबंधीचा जीआर अजूनपर्यंत काढलेला नाही. मंडळांचे लोक आम्हाला येऊन भेटत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com