Aditya Thackeray News : आता भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत 'या' नेत्याचीही भर; नागपुरात झळकले बॅनर

Nagpur Tour : नागपुरातील बॅनर्सची राज्यात चर्चा
Banner in Nagpur
Banner in NagpurSarkarnama

Aditya Thackeray Nagpur Tour : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सोमवारी (ता. २२) नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागताचे नागपूर शहरात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लागले आहेत. त्यात काही बॅनर मात्र लक्षवेधी ठरत आहेत. त्यावर आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्रीपदावरून राज्यभरात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

काही महिन्यांपासून राज्यात अनेकांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागत आहेत. यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांचेही काही ठिकाणी फलक लागले होते. त्यातच आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर नागपूरात लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणखी एका नेत्याची भर पडल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. (Marathi Latest News)

Banner in Nagpur
Solapur News : भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांनीच केली पक्षाची पोलखोल; म्हणाले, "वचननामा लोकांना..."

नागपूर दौऱ्यात पर्यावरण मंत्री राहिलेले आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) कोराडी वीज प्रकल्पामुळे प्रदूषणाचा सामना करणाऱ्या नांदगाव आणि वराडा गावाला ते भेट देणार आहेत. संबंधित गावांतील लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आदित्य यांच्या नागपूर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, ते नागपूरला येण्यापूर्वीच रामटेक आणि कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्टॉपवर काही बॅनर्स लागले आहेत. त्यात त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. या फलकांवर 'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत', असा मजकूर आहे.

Banner in Nagpur
BJP News: नड्डांच्या राज्य दौऱ्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष नेमण्याची डेडलाईन हुकली; इच्छुक धास्तावले

ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे बॅनर्स लावले आहेत. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह बावनकर आणि मेश्राम यांचेही फोटो आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. त्यानंतर आता आदित्य यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. त्यामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com