Devendra Fadnavis : 'मविआ'चा फेक नरेटिव्ह संपला; फडणवीस म्हणाले, 'देशाचा मूड...'

Devendra Fadnavis criticizes opponents after victory in Haryana elections : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरियाणा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर विरोधकांना चांगलंच डिवचलं.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : हरियाणातील विजयाने भाजपमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. ठिकठिकाणी जल्लोष करत आहेत. महाराष्ट्रातही भाजपच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा फेक नरेटिव्ह संपला आणि देशाचा मूड बदलला असल्याचे विधान करून पुन्हा महायुतीच सत्तेवर येण्याचे संकेत दिले.

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, "हरियाणाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. इंडिया आघाडीने विजयाची तयारी केली होती. केव्हा एकदा निकाल जाहीर होतो आणि भाजपवर हल्ला करतो, याची तयारी शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी करून ठेवली होती. ते आता तोंडघशी पडले आहेत". देशाचा मूड बदलला असल्याचे त्यांच्याही लक्षात आले आहे. कालपर्यंत ‘हम साथ साथ है‘ म्हणणारे ‘हम तुम्हारे है कौन' असे आता म्हणून लागले आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Devendra Fadnavis
Sunil Kedar : अडचणी पाठ सोडेना! भाजपची खेळी अन् प्रचाराऐवजी काँग्रेसचे 'दबंग' नेते सुनील केदार अडकून पडणार नव्या चौकशीत

'अर्थमंत्री असताना राज्यात आठ नवीन मेडिकल कॉलेजची घोषणा केली होती. त्यापैकी पाच विदर्भात होऊ घातले आहे. यात गडचिरोली, भंडारा, वाशीम, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. नव्या मेडिकल कॉलेजच्या निर्मितीमुळे महाराष्ट्रातील मेडिकल सीटमध्ये मोठी वाढ होईल आणि त्याचा फायदा होईल', असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Nagpur BJP and NCP : 'आम्ही कमळाचे काम करू मात्र...' ; नागपूरात मतदारसंघावर भाजपच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीनेही केली भूमिका स्पष्ट!

12 हजार कोटींचे कामांना सुरवात

फडणवीस यांच्या हस्ते आज अर्धाडझन कामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण होऊ घातले आहे. नागपूर विमानतळाचा विस्तार आणि विकास करण्याची निविदा आधीच काढण्यात आल होती. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यात सुमारे दोन वर्षांचा वेळ गेला आहे. आता सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिला, असल्याने नागपूरच्या विमानतळाला आंतराष्ट्रीय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागनदीचे काम सुरू झाले आहे. पोहरा नदीसाठी साडेसातशे कोटी रुपये मंजूर झाले आहे. एकट्या नागपूर शहरात बारा ते तेरा हजार कोटींच्या कामाला सुरुवात होत असल्याचे फडणवीस यांनी सांगतिले.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी होस्टेल सोय

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी होस्टेल सुरू करण्याची घोषणा महाविकास आघाडीने केली होती. मात्र अडीच वर्षे सत्तेवर असताना एकही होस्टेल सुरू केले नाही. महायुती सरकारच्या प्रयत्नातून 52 होस्टेल आज सुरू होत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना शहरात शिकण्यासाठी हक्काचा स्थान यामुळे मिळणार आहे. ज्या ठिकाणी होस्टेल नाही तिथे विद्यार्थ्यांना भत्तासुद्धा देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com