Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींनंतर आता आशा सेविकांसाठी 'गुड न्यूज'; देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा

Big Announcement of Devendra Fadnavis : लाडक्या बहिणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा सेविका, आरोग्य सेविकांना मोबाईल सोबतच रिचार्जसाठी पैसे दिले जाणार असल्याची घोषणा नागपूर येथे केली आहे.
Ladaki Bahin Yojana
Ladaki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 02 August : विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने महायुतीच्यावतीने विविध सरकारी योजनांचे चौकार, षटकार ठोकले जात आहेत. अशातच आता लाडक्या बहिणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आशा सेविका, आरोग्य सेविकांना मोबाईल सोबतच रिचार्जसाठी पैसे दिले जाणार असल्याची घोषणा नागपूर येथे केली.

राज्य शासनाच्या वतीने महिला, युवक आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्या एकाच वेळी सुरू होणार नाहीत. मात्र, आम्ही वेगाने निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. ज्या योजना जाहीर केल्या त्याची झटपट अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितलं.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामटेकचे खासदार श्यामकुमारे बर्वे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, आमदार परिणय फुके, आशिष जयस्वाल, प्रवीण दटके, समीर मेघे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते आशासेविकांना मोबाईचे वाटप करण्यात आले.

मोबाईल दिला मात्र रिचार्ज कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे लक्षात घेत फडणवीसांनी भाषणाच्या सुरुवातीला सर्वांची शंका दूर केली. मोबाईल रिचार्जसाठी खनिज विकास निधीतून वार्षिक निधी दिला जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

Ladaki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : ...त्यामुळे 2 महिन्यांनंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत..., संजय राऊतांचा मोठा दावा

तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्यांना राज्य शासनाच्यावतीने 10 हजार रुपये वेतन दिले जाईल. त्यामुळे खासजी कंपन्यांवरचा भार कमी होईल आणि अधिकाधिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल. प्रशिक्षित झालेल्या युवकांना एकतर तिथेच नोकरी मिळेल तर काहींना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून रोजगार दिला जाईल.

Ladaki Bahin Yojana
Devendra Fadnavis : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार की महाराष्ट्रातच..? फडणवीसांनी तीन शब्दांत विषय संपवला...

तसेच कौशल्यावर आधारित स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. दीड लाखांची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. आता या योजनेचा लाभ राज्यातील 12 कोटी जनतेला घेता येईल.

पाच लाखांपर्यंत ऑपरेशनचा खर्चही दिला जाईल. यापूर्वी फक्त दीड लाख रुपये दिले जात होते. चॅरिटी हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी बेड राखीव असतात. यापूर्वी याची माहिती कोणालाच दिली जात नव्हती. मोफत उपचार केले जात नव्हते. आम्ही यासाठी एक डायनामिक प्लॅन तयार केला असल्याचेही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com