AIMIM Corporator Attack : AIMIM नगरसेवकाला 15 ते 16 जणांनी घेरत जीवघेणा हल्ला; अझहर शेख यांचा 'मला संपवण्याचा कट होता' काँग्रेसवर गंभीर आरोप

AIMIM corporator Azhar Shaikh alleges Congress workers behind brutal Chandrapur attack : चंद्रपूर महापालिकेतील AIMIMचे नगरसेवक अझहर शेख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू.
AIMIM Corporator Attack
AIMIM Corporator AttackSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Political Attack : चंद्रपूर महापालिकेतील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे एकमेव नगरसेवक अझहर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्यामागे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप अझहर शेख यांनी केला आहे. मात्र, या आरोपांवर संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा AIMIMचे अझहर शेख हे चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील त्यांच्या बिर्याणी हॉटेलसमोर उभे असताना 15 ते 16 जणांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या मारहाणीतून जीव वाचवण्यासाठी त्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले जात आहे.

हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी (Police) संबंधित फुटेज ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम वेगवान केली आहे.

AIMIM Corporator Attack
Uddhav Thackeray on Nitin Gadkari : धर्मेंद्र प्रधाननंतर 'मविआ'चे पुढचे टार्गेट ठरले! नितीन गडकरींचे इथेनाॅल धोरण; ठाकरे अन् काँग्रेसचे थेट संकेत

प्राथमिक माहितीनुसार, रहमतनगर परिसरातील स्थानिक राजकीय वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अझहर शेख हे रहमतनगर भागाचे नगरसेवक आहेत. त्यांनी काँग्रेसच्या नगरसेविका सोफिया तवंगर यांचे नातेवाईक तसेच सोहेल रजा यांच्यासह काही जणांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

AIMIM Corporator Attack
Shrikant Shinde Minister : श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रीपद! सुनील तटकरेंकडून शिवसेना अन् एकनाथ शिंदेंच्या वाढलेल्या ताकदीची स्तुस्ती

अझहर शेख यांचा प्रतिस्पर्धींवर गंभीर आरोप

उपचारादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना अझहर शेख यांनी, "माझ्या कामामुळे राजकीय विरोधक घाबरले आहेत. मला संपवून वॉर्डात पुन्हा निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा आरोप केला.

पोलिसांकडून घटनास्थळावरून सीसीटीव्ही ताब्यात

घटनेची माहिती मिळताच अझहर शेख यांच्या समर्थकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. दरम्यान, पोलिसांकडून सर्व बाजूंची पडताळणी करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com