

BJP Modi government : केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारकडून नीट पेपर फुटीप्रकरणावरून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामा घेतल्यानंतर पुढचे टार्गेट काय, असणार यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढील संकेत दिले आहेत.
केंद्र सरकारच्या इथेनॉलविषयक धोरणावर बोट ठेवत त्यांनी आगामी काळात हाच विषय पेटवणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर थेटच संघर्षाची मोठी भाषा केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात, मुंबईत विद्यार्थी यांची विजयी तिरंगा रॅली काढली. या रॅलीत उद्धव ठाकरे यांनी देशातील युवकांचे, 'Gen-Z'नी, केंद्रातील अंहकारी आणि हुकुमशाही सरकारला झुकत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याचे कौतुक केले.
युवकांना आव्हान करताना ही केंद्रातील भाजप (BJP) सरकारविरोधातील ही लढाई येथेच संपली नाही, तर देशातील महागाई आणि सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून केंद्रीय मंत्री इतर पक्ष फोडण्यात आणि सहकाऱ्यांचा बचाव करण्यात मग्न असल्याचा उद्धव ठाकरे यांनी केला.
ईव्हीएम किंवा मते चोरता येतील, पण जनतेचा रोष आणि मनं चोरता येत नाहीत. तरुणांनी अन्यायाविरुद्ध पेटवलेली ही ठिणगी देशाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, इथेनॉल मिश्रित इंधनामुळे देशातील वाहने क्षतिग्रस्त झाल्याचे म्हणत, केंद्र सरकारचे सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या धोरणांविरोधात तीव्र राजकीय संघर्ष करण्याचा इशारा दिला.
एकीकडे नीट परीक्षा भ्रष्टाचार प्रकरणात धर्मेंद्र प्राधानाचा राजीनामा झाला, तर याच आंदोलनात इथेनॉल धोरणाविरोधात सुद्धा पोस्टर झळकल्याकडे सपकाळ यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारचे इथेनॉल धोरण चुकीचे असून, त्यावर पंतप्रधानांनी माफी मागावी , अशीही मागणी त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.