MNS News: राज ठाकरे महायुतीची झोप उडवणार, मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 70 वॉर्डमध्ये मनसेचा दरारा, तर उद्धव ठाकरेंनाही मोठी संधी

Raj Thackeray MNS Mumbai elections : उद्धव ठाकरे हे धुरंधर राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्याचमुळे 'अभी नही तो कभी नही' म्हणत त्यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती त्यातही भाजप- एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेशी जुळवून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवलेल्या महायुतीसमोर बीएमसी निवडणुकीत तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 20 वर्षांपासूनचं राजकीय शत्रुत्व संपवत एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई महापालिकेत मनसेची जोड मिळाली तर ठाकरे बंधूंचं पारडं महायुतीवर वरचढ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्धव ठाकरे हे धुरंधर राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्याचमुळे 'अभी नही तो कभी नही' म्हणत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती त्यातही भाजप- एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना मनसेशी जुळवून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरे हे धुरंधर राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांचं मनसेला सोबत घेण्यापाठीमागचं महत्व कारण म्हणजे मनसेचा मुंबई महापालिकेच्या जवळपास 70 वॉर्डमध्ये दरारा असल्याचं समोर आलं आहे.

महायुती सरकारनं हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांच्या 'मातोश्री' आणि 'शिवतीर्था'वर भेटीगाठी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे. 2022मध्ये शिवसेना फुटल्यानंतर आणि महाविकास आघाडीचं सरकार पायउतार झाल्यानंतर राज ठाकरे हे त्यांच्या मनसेला घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजपशी जवळीक वाढवल्याचं पाहायला मिळालं होतं.तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवल्यामुळे दोन्ही बंधूंमधील दरी वाढतच गेली होती.

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मनसेला सोबत घेण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे मनसेनं स्वतंत्र लढ्यात जवळपास 150 च्या वर जागा लढवत आणि संपूर्ण ताकद लावत नशीब आजमावलं. पण मनसेला भोपळाही फोडता आला नाही.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Pune News: भाजपशी पंगा घेणाऱ्या शिंदेंच्या नेत्यासाठी आता ठाकरेंचा वकील मैदानात; धंगेकरांसाठी कोर्टात ताकद लावणार

महत्वाची बाब म्हणजे अमित ठाकरेंनाही माहिम मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. यावेळी शिंदेंनी आणि भाजपनं अमित ठाकरेंसाठीही माघार घेण्याची तयारी दाखवली नाही, हीच बाब मनसे आणि राज ठाकरेंना खटकल्याचे बोलले जात आहे. यानंतरच राज ठाकरे मनाने महायुतीपासून दूर गेल्याची चर्चा आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत मोठा फटका बसला होता. त्यांच्या शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवल्यानंतरही मताधिक्य घटल्याचे दिसून आलं होतं. मुंबई महापालिकेच्या (BMC) 227 प्रभागांपैकी 67 प्रभागांमध्ये मनसेच्या उमेदवारांनं विजयी मताधिक्यापेक्षा अधिकची मतं मिळवली होती.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Vaibhav Khedekar : तीनवेळा पक्षप्रवेश हुकलेल्या वैभव खेडेकरांचा अखेर भाजप प्रवेश संपन्न : हाती कमळ घेतल्यानंतरही काढली राज ठाकरेंची आठवण

मुंबई शहरातील वरळी,दादर,माहीम,घाटकोपर,विक्रोळी,दिंडोशी-मालाड या प्रमुख भागांत मनसेची ताकद प्रामुख्याने असल्याचं बोललं जातं. या भागांत मनसेच्या (MNS) उमेदवारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांच्या तुलनेत 50 टक्क्यांपर्यंत मतं मिळवल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे मनसेनं 67 प्रभागांत मिळवलेली मतंही विजयी उमेदवारांच्या विजयी मताधिक्यापेक्षा अधिक होती.

मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद 39 प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.2024 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं मुंबईतील 25 जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत मराठी मतदारांचा प्रभाव असलेल्या भागात मनसेच्या उम्दवारांनी 4 टक्के मते मिळवल्याचं पाहायला मिळालं होतं. मुंबईतील एकूण 123 प्रभागांवर मनसेचा प्रभाव दिसून आला होता. त्याचमुळेच आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Sangola Politic's : शहाजीबापूंच्या चिरंजीवाची ZP एन्ट्री हुकली; दीपक साळुंखेंचा मुलगा जवळ्यातून रिंगणात उतरणार, शेकापकडे लक्ष

विशेष म्हणजे मनसेचा या निवडणुकीत 10 प्रभागांमध्ये मतांचा आकडा हा विजयी मताधिक्याच्या जवळपास जाणारा होता; तर मनसेच्या उमेदवारांनी 25 प्रभागांमध्ये मविआला मिळालेल्या मतांच्या 50% हून अधिक जास्त मतं मिळवली होती. तसेच 37 प्रभागांमध्ये मनसेच्या मतांचा वाटा 30 ते 49 टक्क्यांपर्यंत असल्याचं दिसून आलं होत.

दिंडोशी विधानसभा मतदारसंघात मनसेनं 7 पैकी 6 प्रभागांमध्ये विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतं घेतली होती. या मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 43 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारानं महायुतीच्या उमेदवारावर 1 हजार 88 मतांची आघाडी तर मनसेच्या उमेदवारानं 1 हजार 728 मतं मिळवल्याचं दिसून आलं होतं.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Baramati Politics : बारामतीत घड्याळाला पुन्हा तुतारीचेच कडवे आव्हान ; मातब्बरांचे चार गण खुले झाल्याने चुरस

वांद्रे पूर्वमधील वॉर्ड क्रमांक 92 मध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातला मतांचा फरक 623 होता, तर मनसेच्या उमेदवाराला 1 हजार 04 मतं होती. जोगेश्वरी पूर्वमधील वॉर्ड क्रमांक 57 मध्ये महायुतीच्या उमेदवाराला मविआच्या उमेदवारापेक्षा 482 मतांची आघाडी होती. तर याच वॉर्डात मनसेच्या उमेदवारानं 918 मते होती. विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 121 मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मतांचा फरक केवळ 843 होता; तर मनसेच्या उमेदवाराला 1 हजार 96 मतं मिळाली होती.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष सध्याजरी कमकुवत आणि छोटा पक्ष वाटत असला, तरी तो कमीतकमी 90 प्रभागांमध्ये किंगमेकर ठरू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. याचकारणास्तव उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेसोबत युती करण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे.जर भविष्यात ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेत त्यांचं पारडं महायुतीवर जड असण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com