

NCP Ajit Pawar faction : महापालिका निवडणुकीत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं पुरतं पानीपत झालं. अहिल्यानगर वगळता, पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे अन् पिंपरी-चिंचवड इथं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पुरतं पानीपत झालं.
या निकालानंतर दोन्ही पवार गोविंद बागेत, एकत्र येत जवळपास दीड तास खलबतं करत होती. दरम्यान, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी निवडणूक प्रक्रियेवर जोरदार हल्लाबोल करत मोठी मागणी केली.
अमोल मिटकरी यांनी पुणे (Pune) अन् पिंपरी चिंचवड इथं अजितदादांनी खूप काम केलं. तरी देखील पराभव कसा? असा प्रश्न उपस्थित करत, अमोल मिटकरी यांनी, राज्यात यापुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावात, अशी मागणी केली. सरकार अन् निवडणूक आयोगाला आपल्यावरचा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर हा निर्णय घ्यावाच लागेल, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.
आमदार मिटकरींनी 'बॅलेट'वर मतदान (Voter) घेण्याची मागणी करीत, विरोधकांच्या सुरात सुर मिसळला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम करूनही आमच्या पक्षाचा पराभव कसा होऊ शकतो? असा सवाल त्यांनी केला. ईव्हीएमचा फायदा काही ठराविक पक्षांनाच कसा होतो? असाही प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला.
महापालिकांमधील निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते पवार, गोविंद बागेत, एकत्र आले होते. यावरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा होती. आगामी जिल्हा परिषद निवडणुका जिंकण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित कंबर कसतील अशी चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादीकडील नेत्यांकडून संमिश्र अशा प्रतिक्रिया येत होत्या.
यावर अमोल मिटकरी यांनी, आज दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची झालेली बैठक हा दैनंदिन प्रक्रियेचा भाग आहे. दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार आणि अजित पवार घेतील. दरम्यान, कुटुंब म्हणून, पवार कुटुंब हे कायमच एक आहे, असे मिटकरी यांनी म्हटले.
दोन्ही पवार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आत्मचिंतन केलं पाहिजे, असा निकाल का आला? 12 जिल्हा परिषद एकत्र लढतोय," हे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे. अजित पवार आणि तुमची, बंद दाराआड चर्चा झाली, यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी, दार बंद असल्यानंतर, त्याची चर्चा बाहेर येते का?, असा प्रतिप्रश्न करत मिश्किल टिप्पणी केली.
तुम्ही केंद्रीय मंत्री होणार आहात? या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी, अशा चर्चा चालूच असतात. आधी लग्न कोंढाण्याचं, म्हणजेच जिल्हा परिषदे निवडणुकांवर बोलू. जिल्हा परिषद महत्वाची निवडणूक, असून कार्यकर्त्याची आहे, त्यासाठी एकत्र करून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे. पुण्याची जिल्हा परिषद राज्यात नाहीतर, देशात अतिशय उत्तमपणे काम करणारी जिल्हा परिषद आहे. त्यावर जबाबदार लोकांनी निवडून जावे, या जिल्ह्याची आन-बाण अन् शान उंच व्हावी, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.