
Nagpur News, 27 Aug : नागपूर महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूरचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना मोठा धक्का दिला.
त्यांच्याऐवजी प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर यांच्याकडे शहराची धुरा सोपवली. पवारांना प्रदेश सरचिटणीस केले असले तरी त्यांचा शहरातील हस्तक्षेप मात्र बंद केला आहे. 4 दिवसांपूर्वी अजित पवार नागपूरला आले होते.
त्यांनी पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी प्रशांत पवार यांनी आमची कामे होते नाहीत, आमच्या निवेदनांना केराची टोपली दाखवली जाते, साधा दंडाधिकारीसुद्धा अद्याप नेमला नसल्याची तक्रार केली होती.
नागपूर महापालिकेची निवडणुकीत 40 जागांची त्यांनी मागणी केली. महायुती झाली तर आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देऊ नका अशी विनंती त्यांनी केली होती. दादांनी आपल्या भाषणात मी कोणाचीही वैयक्तिक कामे करणार नाही, असे यावेळी ठणकावून सांगितले होते.
जे नियमात बसत असेल तेच कामे घेऊ या, उगाच मुंबईत व माझ्या मागेपुढे चकरा मारू नका. माझ्या कार्यालयात आलेल्या प्रत्येक निवेदन आणि ते कोणी दिले याची नोंद ठेवली जाते असे सांगून केराची टोपली दाखवली जाते हा आरोपांना फेटाळून लावले होते. तुमची काही कामे असेल तर आजच्या आज माझ्याकडे द्या.
नागपूर विमानतळावर आणून द्या, असे आदेशच त्यांनी दिले होते. दादांच्या भाषणाचा रोख कोणाकडे होता हे त्यावेळी कोणालाच कळले नाही. मात्र चार दिवसांतच नागपूरच्या अध्यक्ष बदलण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना अनिल अहीरकर नागपूर शहराचे अध्यक्ष होते. अजित दादा यांच्यासोबत आल्यानंतर त्यांना प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले होते.
त्यानंतर पवार आणि अहीरकर असे दोन गट शहरात पडले होते. पवार आणि अहीरकर यांच्यामध्ये नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदासाठी सुप्त स्पर्धा सुरू होती. अडीच वर्षांच्या महायुतीच्या कार्यकाळापासून राष्ट्रवादी काँग्रेसने हे पद रिक्त ठेवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने अहीरकर यांच्यासोबतच काँग्रेसमधून आलेले माजी नगरसेवक तानाजी वनवे यांचीसुद्धा सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. वनवे नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती होते. मागील कार्यकाळात ते काँग्रेसचे गटनेते होते. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.