BJP Politics : भाजप लोकसभेचं आत्मचिंतन करणार; विधानसभेची रणनीतीही ठरवणार; आता 'या' दिवशी अमित शाह पुण्यात

Lok Sabha And Vidhan Sabha Election : लोकसभेत 23 वरून थेट 9 वर घसरण झाल्याने भाजपच्या जिव्हारी लागले आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपची पीछेहट झाली आहे. या कामगिरीचे आत्मचिंतन करण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवीन रणनीती बनवण्यासाठी भाजपची पुण्यात बैठक होणार होती.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार होते. मात्र रविवारी (ता. 14) होणारी ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक 21 जुलै रोजी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला अवघ्यात नऊ जागा मिळाल्या आहेत. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये हा आकडा 23 होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये नंतर विरोधकांचे बळ आणि ताकद देखील वाढल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर लोकसभेत झालेली पीछेहाट नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली, याचं आत्मचिंतन या बैठकीमध्ये करण्यात येणार आहे. तसेच आगामी निवडणुकीत कशाप्रकारे नियोजन करायचे, यावर आढावा घेण्यात येणार आहे.

त्याबाबतची बैठक येत्या रविवारी म्हणजेच 14 जुलै रोजी होणार होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्या मातु:श्रीचे निधन झाल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता ही बैठक 21 जुलै रोजी होणार आहे.

बैठकीला गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्रातील काही मंत्री आणि राज्यातील सर्व खासदार, आमदार, शहर आणि जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत.

BJP
Nitesh Rane VS Aaditya Thackeray : ...तर आदित्य ठाकरे जेलमध्ये असते; नितेश राणेंचं वर्मावर बोट

पुण्यातील बालेवाडी येथे होणाऱ्या बैठकीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी करण्यात आली. केंद्रातील आणि राज्यातील अनेक मंत्री या बैठकीच्या आधी एक दिवस पुण्यात येणार असून त्यांच्या निवासाची सोय विविध हाॅटेलमध्ये करण्यात येणार आहे.

गृहमंत्री अमित शहा Amit Shah हे शनिवारी 20 जुलैला पुणे मुक्कामी येणार आहेत. तसेच या बैठकीला किमान तीन हजार पदाधिकारी उपस्थित असतील, असे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

BJP
Jalna Congress News : लोकसभेनंतर रावसाहेब दानवेंना काँग्रेस दुसरा धक्का देणार? विधानसभेचा प्लॅन ठरला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com