Ajit Pawar NCP : चिंतन शिबीर आटोपताच अजित पवारांना धक्का; जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा  

Ajit Pawar Faces Setback After Chintan Shibir : अजित पवारांसोबत राहायचे की पवार साहेबांसोबत असा पेच नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असताना बाबा गुजर यांची माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
Baba Gujar-Ajit Pawar
Baba Gujar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Nagpur District President Baba Gujar Resigns : राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर आटोपताच नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी राजीनामा देऊन पक्षांतर्गत खळबळ उडवून दिली. आठ वर्षांपासून आपण जिल्हाध्यक्ष आहोत, नव्या लोकांना संधी मिळावी तसेच तब्येतीचे कारण सांगून त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र यावर कोणाचाच विश्वास नसल्याने वेगवेगळे राजकीय तर्क लावले जात आहे. हा राजीनामा आहे की नाराजीनामा अशी चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी प्रशांत पवार यांच्याकडून नागपूर शहर अध्यक्षपद काढून घेण्यात आले. त्यांची नियुक्ती प्रदेश कार्यकारिणीत करण्यात आली. बाबा गुजर आणि प्रशांत पवार हे अजित पवार चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले तेव्हापासून त्यांच्यासोबत होते. बाबा गुजर त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही जिल्हाध्यक्ष होते. सहा वर्षानंतर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

अजित पवारांसोबत राहायचे की पवार साहेबांसोबत असा पेच नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असताना बाबा गुजर यांची माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी गुजर यांनी आपला निर्णय जाहीर केला नव्हता. ते मुंबईला अजित पवार यांना भेटायला गेले आणि तेथूनच नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद घेऊन आले होते. तेव्हापासूनच ते अध्यक्षपदी आहेत.

Baba Gujar-Ajit Pawar
Narhari Zirwal News : झिरवाळांच्या विभागात नवनियुक्त अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचं ट्रेनिंग? विजय कुंभार यांचा थेट आरोप, मिळाला 'पंचतारांकित' व्हिडीओ

बाबा गुजर यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पाठवला आहे. तो अद्याप मंजूर झालेला नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला राजीनामा पक्ष स्वीकारतो की काही दिवस त्यांना थांबण्याचा सल्ला दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाबा गुजर यांनी आपण कोणाच्याही दबावात राजीनामा दिला नाही. आपली कोणाविषयी तक्रार नाही. आठ वर्षांपासून एकाच पदावर असल्याने दुसऱ्याला संधी मिळावी यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचा दिलेला नाही. आपण पक्षाचे काम करीत राहणार आहोत. माझी कुणावरच नाराजी नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Baba Gujar-Ajit Pawar
Fadnavis Ajit Pawar Video : फडणवीस, अजितदादांचे जुने व्हिडीओ रोहित पवारांकडून व्हायरल; म्हणाले, आज त्यापेक्षा भयानक स्थिती...

नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात अजित पवार यांनी पक्षांतर्गत बदलाचे संकेत दिले होते. ज्यांना वेळ देता येत नाही, त्यांनी बाजूला व्हावे अशी सूचना केली होती. त्यांनी जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांना टाळणाऱ्या पालकमंत्री आणि मंत्र्यांवरही नाराजी व्यक्त केली होती. हीच नाराजी बाबा गुजर यांनी यापूर्वीसुद्धा व्यक्त केली होती. चिंतन शिबिर आटोपल्यानंतर अनेक मंत्री नागपूरमध्ये मुक्कामाला होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या खात्यांतर्गत येणाऱ्या विविध संघटनांच्या बैठका घेतल्या. त्याची माहिती नागपूरमधील पदाधिकाऱ्यांना देण्यात आली नव्हती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com