Narhari Zirwal News : झिरवाळांच्या विभागात नवनियुक्त अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचं ट्रेनिंग? विजय कुंभार यांचा थेट आरोप, मिळाला 'पंचतारांकित' व्हिडीओ

Allegations of Corruption Training in Narhari Jirwal’s Department: अंदाज समितीच्या चांदीच्या ताटातील जेवणावर प्रत्येकी 4500 रूपये खर्च केले जात असतील तर इतर अधिकाऱ्यांनी तरी मागे का रहावं?, असा खोचक सवालही विजय कुंभार यांनी केला आहे.
"Vijay Kumbhar alleges corruption training in Narhari Jirwal’s department as viral five-star video fuels controversy."
"Vijay Kumbhar alleges corruption training in Narhari Jirwal’s department as viral five-star video fuels controversy."Sarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात महत्वाचे :

  1. अन्न व औषध प्रशासनातील नवनियुक्त अधिकाऱ्यांचे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षण झाल्याचा आरोप आम आदमी पक्ष नेते विजय कुंभार यांनी केला आहे.

  2. या प्रशिक्षणाचा खर्च शासकीय निधी, कंपनी स्पॉन्सरशिप की हॉटेलकडून फुकटात झाला? या संदर्भात कुंभार यांनी भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त केला आहे.

  3. प्रशिक्षणाची सुरूवातच भ्रष्टाचाराने झाली असून यावर सचिव व आयुक्त मौन बाळगत असल्याचा आरोप करत कुंभार यांनी शासनावर थेट टीका केली आहे.

Vijay Kumbhar’s Direct Accusations Explained : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ हे मंत्री असलेल्या अन्न व औषध विभागातील नवनियुक्त अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणावरून वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी अधिकाऱ्यांचे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ट्रेनिंग झाल्याचा आरोप केला असून त्याचा व्हिडीओही सोशल मीडियात पोस्ट केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातील नवनियुक्त अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंगवर कुंभार यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, MPSC च्या अन्न व औषध प्रशासनातील नवनियुक्त अधिकाऱ्यांना मुंबईतील पंचतारांकित हॅाटेल मध्ये पंचतारांकित ट्रेनिंग देण्यात आलं. ते बेकायदा आहेच.

अंदाज समितीच्या चांदीच्या ताटातील जेवणावर प्रत्येकी 4500 रूपये खर्च केले जात असतील तर इतर अधिकाऱ्यांनी तरी मागे का रहावं?, असा खोचक सवालही कुंभार यांनी केला आहे. या कार्यक्रमाचा खर्च कोणाकडून झाला? शासकीय निधी, कंपनी स्पॉन्सरशिप की हॉटेलकडून फुकटात सुविधा? शासकीय निधीतून असा खर्च करता येत नाही आणि खाजगी कुणी केला असेल तर तो थेट भ्रष्टाचार आहे. काहीही असलं तरी ते बेकायदाच आहे, असे कुंभार यांनी म्हटले आहे.

"Vijay Kumbhar alleges corruption training in Narhari Jirwal’s department as viral five-star video fuels controversy."
Fadnavis Ajit Pawar Video : फडणवीस, अजितदादांचे जुने व्हिडीओ रोहित पवारांकडून व्हायरल; म्हणाले, आज त्यापेक्षा भयानक स्थिती...

अन्न आणि औषध प्रशासन विभागात बरेच अधिकारी बेकायदा, नियम वाकवून आणि मोडून काम करत आहेत. ट्रेनिंगची सुरूवात भ्रष्टाचारापासून झाली हे एक बरं झालं. खात्याचे सचिव व आयुक्त कुठे आहेत की त्यांच्या मान्यतेनेचं हे सगळं चाललं आहे?, असा सवाल करत कुंभार यांनी आता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीसारख्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था शासनाने बंद करून टाकाव्यात, अशी टीका केली आहे.

"Vijay Kumbhar alleges corruption training in Narhari Jirwal’s department as viral five-star video fuels controversy."
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंना ‘हे’ पाऊल उचलावंच लागेल; सरकारकडून दुर्लक्षित विभाग 'सशक्त' करायचाय...

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कुठे झाले?
A: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये.

Q2: हा आरोप कोणी केला?
A: आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी.

Q3: कुंभार यांनी कोणता मुख्य सवाल उपस्थित केला?
A: या कार्यक्रमाचा खर्च शासकीय निधीतून झाला की खाजगी मार्गाने?

Q4: कुंभार यांची पुढील मागणी काय आहे?
A: अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रबोधिनीसारख्या संस्थाच बंद करण्याची.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com