Siddharam Mhetre VIDEO : जाळून टाकेल! काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रेंनी अधिकाऱ्याला धमकावलं

Former Congress MLA Siddharam Mhetre Threatens Officials: काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी अधिकाऱ्याला धमकावलं आहे. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.
Siddharam Mhetre
Siddharam MhetreSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. महाविकास आघाडीतर्फे एक आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर सिद्धराम म्हेत्रे यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे. म्हेत्रे यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

पंचायत समिती मी बांधली आहे. त्या पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला त्यामध्ये टाकेल, अशी धमकी सिद्धाराम म्हेत्रे ( Siddharam Mhetre ) यांनी गट विकास अधिकाऱ्याला दिली आहे. अक्कलकोटमधून सिद्धराम म्हेत्रे हे काँग्रेसकडून पुन्हा विधानसभा निवडणूक लढू शकतात. त्यातच आता शिवीगाळाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर म्हेत्रेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

घडलं काय?

26 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीतर्फे तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांविरोधात हलगीनाद आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलनानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कविटके यांना माजी आमदार म्हेत्रे यांनी दमदाटी दिला.

Siddharam Mhetre
Solapur BJP : विरोधातील पदाधिकाऱ्यांची संख्या पाहून देशमुख समर्थकांची एकच पळापळ...

म्हेत्रेंनी नक्की काय म्हटलं?

सिद्धराम म्हेत्रे म्हणाले, "तुम्हाला आम्ही शिस्तीत आणि लोकशाही पद्धतीनं सांगत आहोत. पंचायत समिती मीच बांधली आहे. ही पंचायत समिती जाळायला किती वेळ लागतो आहे. ती जाळून तुम्हाला आतमध्ये टाकतो. मग काय करणार तुम्ही? माझं कोण ****** काही करू शकत नाहीत."

Siddharam Mhetre
Solapur BJP : मातब्बर दोन देशमुखांना भाजपमधूनच चॅलेंज; हायकमांडच्या निर्णयाकडे लक्ष

"माझ्यावर एक गुन्हा दाखल होईल. ती केस उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात 25 वर्षे चालेल. माझं आयुष्य कोर्ट, कचेरी आणि केसमध्ये गेलं आहे. त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही. शांत बसलो, म्हणून तुम्ही फार करू लागला काय?" असं म्हणत म्हेत्रेंनी अधिकाऱ्यांना धमकावलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com